Type Here to Get Search Results !

'अमर रहे'च्या जयघोषात शहीद निलेश सोनवणे यांना अखेरचा निरोप

म. टा. प्रतिनिधी । लडाख येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले येथील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्यावर काल गिरणा तीरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Last Rites of held in ) भडगाव येथील टोणगाव परिसरात राहणारे निलेश सोनवणे हे सन २०१० मध्ये सैन्य दलात महार बटालियनमध्ये भरती झाले होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना १० जुलै रोजी सकाळी लेह लडाख येथे वीरमरण आले होते. काल त्यांचे पार्थिव औरंगाबादहून सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरी आणल्यानंतर त्यांच्या परिवाराने आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर सजविलेल्या वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर परिसरातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जय जवान, जय किसान, वंदे मातरम्, भारत माता की जय, अमर रहे, अमर रहे, निलेश सोनवणे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात युवा वर्ग, परिसरातील नागरिक, नातेवाईक सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावरील घरांसमोर लोकांनी रांगोळ्या काढल्या होत्या. वाचा: गिरणा तीरावरील अंत्यसंस्काराच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिल्यानंतर ग्रिनिडियाल टी. ए.११८ बटालियन, भुसावळ युनिटच्या जवानांनी व त्यानंतर जळगाव पोलीस मुख्यालयातील जवानांच्या तुकडीने आकाशात बंदुकीच्या ३ फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. वाचा: याप्रसंगी आमदार किशोर पाटील, तहसीलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी वाघ, विस्तार अधिकारी टी.पी.मोरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल, वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव, पोलीस निरीक्षक अशोकराव उतेकर, पोलीस उपनिरीक्षक पठारे, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्यासह तालुक्यातील व परिसरातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, युवा व महिला वर्ग, ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VB2tr7

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.