Type Here to Get Search Results !

उल्हासनगरात दुर्घटनांची मालिका; इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जखमी

ठाणे: शहरामध्ये इमारत दुर्घटनांच्या मालिकेत आज आणखी एक घटना घडली आहे. ब्लॉक नंबर ३/ए भागातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ( ) वाचा: ब्लॉक नंबर-३/ए येथील साईबाबा मंदिराजवळ देवऋषी ही तळ अधिक पाच मजल्यांची इमारत असून पहिल्या मजल्यावरील १०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये दुर्घटना घडली आहे. सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हॉलचा स्लॅब खाली कोसळून त्यात (५५), (७) या दोघी जखमी झाल्या. कांता यांच्या पायाला, हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे तर जन्नत हिचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. दोघांनाही मनेरा गाव येथील स्वस्तिक अँडव्हान्स ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन फायर वाहनं व पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले व युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. वाचा: दरम्यान, उल्हानगरमध्ये सातत्याने अशाप्रकारच्या होत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात जुन्या इमारतींमध्ये तर रहिवाशी जीव धोक्यात घालूनच वास्तव्य करत आहेत. गंभीर बाब म्हणजे स्लॅब कोसळण्याची गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wDr0sD

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.