Type Here to Get Search Results !

'राजमहाल' सजला होता; वधूने ऐनवेळी लग्नास नकार दिला अन...

नागपूर: लग्नघटिका जवळ आली असताना आणि वधू व वर पक्षाकडील मंडळींची सारी तयारी झाली असतानाच ऐन वेळी वधूने लग्न करण्यास नकार दिल्याने वऱ्हाड्यांमध्ये खळबळ उडाली. दोन्हीकडील मंडळीमध्ये त्यातून मोठा वाद झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद सोडवून लग्नसोहळा रद्द केला. ही घटना जवळील रिसॉर्टमध्ये मंगळवारी घडली. या न झालेल्या लग्नाची दिवसभर सर्वत्र चर्चा होती. ( ) वाचा: मौद्यातील तरुणीचे अमरावती येथील तरुणासोबत लग्न ठरले होते. मंगळवारी दुपारी १२ वाजताचा मुहूर्त ठरला होता. रामटेक जवळील राजमहाल रिसॉर्ट मध्ये हे लग्न करण्याचे निश्चित झाले होते. सकाळपासूनच तिथे वऱ्हाडींची लगबग सुरू होती. मात्र, लग्नाची वेळ जवळ येताच असा काही प्रकार घडला की तिथे उपस्थित सगळ्यांनाच धक्का बसला. वाचा: मुहूर्ताची वेळ जवळ येताच वधूने थेट नियंत्रण कक्षाला फोन केला आणि माझे दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचे सांगितले. मी अमरावतीच्या तरुणासोबत लग्न करू शकत नाही, अशी माहिती तिने पोलिसांना दिली. याबाबत कळताच वऱ्हाड्यांमध्ये खळबळ उडाली. वराकडच्या मंडळींनी गोंधळ घालायला सुरुवात केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दोन्ही पक्षाकडील मंडळींना पोलीस ठाण्यात आणले. त्यांची समजूत घातली. अखेर समोपचाराने लग्न सोहळा रद्द करण्यात आला. तरुणीने आठ दिवसांपूर्वीच मुलगा पंसत नसल्याचे आईला सांगितले होते. मात्र तिच्या आईने याकडे दुर्लक्ष केले, असे समजते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36yBC17

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.