Type Here to Get Search Results !

'ते' चित्र भारतात कधी पाहायला मिळेल?; हायकोर्टाचे विम्बल्डन फायनलकडे बोट

मुंबई: टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविच आणि माटेओ बेरेट्टीनी यांच्यात रंगलेला पुरुष एकेरीचा अंतिम सामना पाहण्यासाठी टेनिस कोर्ट खच्चून भरलं होतं. प्रेक्षकांनी तोंडाला मास्कही लावले नव्हते. या सामन्याचा दाखला देत मुंबई हायकोर्टाने 'हे चित्र भारतात कधी पाहायला मिळणार' अशी विचारणा आज केली. ( ) वाचा: मुंबई हायकोर्टात आज विषयक याचिकेवर सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती यांनी थेट विम्बल्डनच्या अंतिम सामन्याचा दाखला दिला. 'तुम्ही विम्बल्डनची पुरुष एकेरीची फायनल पाहिली का? त्या सामन्याच्या वेळी सर्वच प्रेक्षक मास्कविना होते. तो आत्मविश्वास तिथे लंडनमध्ये आला आहे सर्वांमध्ये, आम्ही विचार करत होतो की, आपल्या भारतात हे चित्र कधी पहायला मिळणार?', असे महत्त्वाचे निरीक्षणच न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासमोर नोंदवले. वाचा: 'विम्बल्डनच्या या फायनलला टेनिस कोर्ट गर्दीने खच्चून भरलं होतं. कुणाच्याच तोंडाला मास्क नव्हता. प्रेक्षकांमध्ये एक भारतीय क्रिकेटपटू होता. त्यानेही मास्क लावला नव्हता. हे चित्र पाहायचं असेल तर प्रत्येकाचे होणे गरजेचे आहे', असे मतही हायकोर्टाने नोंदवले. काही राज्यांत करोनाची तिसरी लाट आल्याचे सांगितले जात आहे. अशावेळी आपल्याला अधिक सतर्क राहावं लागणार आहे. आता स्थिती नियंत्रणात असली तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही, असेही कोर्टाने पुढे नमूद केले. मुंबईसह पाच जिल्ह्यांत डेल्टाचे रुग्ण आतापर्यंत मुंबई, ठाणे, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये करोना व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई हायकोर्टात दिली. म्युकरमायकोसिस वरील औषध अॅम्फोटेरसिन इंजेक्शन आणि करोनाविषयक उपचारांसाठी जीवरक्षक औषध म्हणून टोसिलीझुमॅब या औषधांची कुठेही गरज असल्यास आणि तुटवडा निर्माण झाल्यास संबंधितांना तातडीने संपर्क साधता यावा यासाठी हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे नोडल अधिकारी कालच (१२ जुलै) नेमले आहेत. नागरिकांना त्याची माहिती मिळावी याकरिता या यादीची प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये व्यापक प्रसिद्धी केली जाईल, असेही आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r71uuw

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.