अमरावती : चिखलदरा येथील जत्राडोहोत पोहण्याचा मोह न आवरल्याने अकोला जिल्ह्यातील २२ वर्षीय युवकाने पाण्यात उडी घेतली. पाण्याचा अंजाद न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यात वाहून गेल्यानंतर तरुणाचा बराच वेळ शोध सुरू होता. पण अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. शनिवारी सकाळपासून शोधकार्य सुरु झाले असून अद्यापही त्या युवकाचा शोध लागला नाही. समीर बेग शकिर बेग (२२, रा. हिवरखेड ता. तेल्हारा जि. अकोला) असे डोहात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. समीर त्याच्या काही मित्रांसह चिखलदरा येथे पर्यटनासाठी आला होता. शुक्रवारी सायंकाळी समीर व त्याचे मित्र चिखलदरा ते सेमाडोह मार्गावरील मरीयमपूरपासून जवळच असलेल्या जत्राडोहाजवळ गेला होता. यावेळी समीरचा पोहचण्याचा मोह अनावर झाला आणि त्याने ‘जत्राडोह’च्या डोहात उडी मारली. याठिकाणी काही भागात ५ फूट तर बाजूलाच सुमारे १५ ते २० फूट खोल पाणी आहे. समीरला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला. ही बाब त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी समीच्या बाचावसाठी प्रयत्न करुन इतरांच्या मदतीसाठी आरडा ओरडा केली. शुक्रवारी सायंकाळी ही माहिती चिखलदरा पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच ठाणेदार राहुल वाढवे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने डोहात समीरचा शोध घेतला मात्र अजूनपर्यंत सापडला नाहीये. दरम्यान, अंधारही झाला असल्यामुळे पोलिसांना शोधकार्य थांबवावे लागले. शनिवारी पहाटे पोलीस समीरचा त्याच ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eRdY4y