Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात पावसाचा ब्रेक, पण पुराचा धोका अजून कायम

म. टा. प्रतिनिधी, सलग तीन दिवस धो धो कोसळलेल्या पावसाने उसंत दिल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा मिळाला असला तरी सर्वच नद्या अजूनही धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे पुढील काही तास धोका कायम असून अजूनही पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गसह जिल्ह्यातील ३५ मार्ग वाहतुकीसाठी बंदच आहेत. आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे कोकणात जाणारा रस्ता दोन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. लष्कराच्या १५ तुकड्या मदत व बचावकार्यासाठी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. (Kolhapur Rains) कोल्हापूर जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाने धुमाकूळ घातला. काही भागात ५०० मिमी पेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने जिल्ह्यात महापूर आला आहे. शुक्रवारी महापुराचा विळखा घट्ट झाला. अर्धे कोल्हापूर शहर पाण्याच्या विळख्यात असून जिल्ह्यातील अनेक गावांना ही पाण्याने वेढले आहे. पंचगंगा नदी सध्या ५५ फुटांपेक्षा अधिक उंचीने वाहत आहे. अजूनही राधानगरी धारणाचे दरवाजे उघडले नाहीत. सध्या हे धरण ९६ टक्के भरले आहे. दुपारपर्यंत धरण १०० टक्के भरल्यानंतर दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. वाचा: तीन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातही पाणी घुसले आहे. पुणे ते बेंगळुरु महामार्गावर दोन ठिकाणी पाणी आल्यामुळे काल पासून हा रस्ता बंद आहे. अजूनही पाच फूट पाणी असल्याने सायंकाळपर्यंत रस्ता सुरू होण्याची शक्यता नाही. ४१ हजार नागरिकांचे स्थलांतर आतापर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार नागरिकांचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले असून अजूनही एनडीआरएफची तीन पथके महापूरग्रस्त भागातील लोकांचे स्थलांतर करत आहेत. काल दिवसभरात महापुरामुळे पाच जणांचा मृत्यू झाला तर शेती पाण्यात गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. याशिवाय घरात पाणी घुसल्याने जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही घट होत आहे. चार दिवसानंतर प्रथमच आज सूर्यदर्शन झाले. अलमट्टी धरणातून तीन लाख क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सांगलीचा धोकाही कमी झाला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WaqeXf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.