Type Here to Get Search Results !

सातारा: आंबेघर दरड दुर्घटनेत १६ बेपत्ता; ग्रामस्थ अद्याप मदतीपासून वंचित

पाटण: जिल्ह्यातील तालुक्यातील आंबेघर गावात दरड कोसळून तब्बल १६ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. मात्र, एनडीआरएफची मदत अद्यापही आंबेघरमध्ये पोहोचू शकलेली नाही. त्यामुळं चिंतेचं वातावरण आहे. (Satara ) अतिवृष्टीमुळं डोंगर खचून आंबेघर गावात गुरुवारी रात्री दरड कोसळली होती. या दुर्घटनेत गावातील सात ते आठ घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तर, जवळपास २० घरांचं नुकसान झालं. १६ जण बेपत्ता झाले आहेत. हे सर्व जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले असावेत, अशी भीती व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर गावात एकच हाहाकार उडाला आहे. मात्र, अद्यापही ग्रामस्थांना मदत मिळालेली नाही. एनडीआरएफची टीम अद्याप पोहोचू न शकल्यानं बचावकार्यही सुरू झालेलं नाही. त्यामुळं लोकांचा आक्रोश सुरू आहे. वाचा: सततच्या पावसामुळं साताऱ्यातील अनेक डोंगरभाग खचले आहेत. जिल्ह्यातील कोंडावळे गावात गुरुवारी संध्याकाळी माळीण सारखी दुर्घटना घडली होती. दरड कोसळून गावातील अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. बचाव पथकानं तातडीनं हालचाली करून २७ जणांना बाहेर काढलं. १८९ कुटुंबांतील ७५५ लोकांचे स्थलांतर पुराचा धोका लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील नदीकाठच्या एकूण १८९ कुटुंबातील ७५५ जणांना त्यांच्या गावातील जवळच्या नातेवाईकांकडे तसेच नगरपालिका शाळा या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं आहे. कराड तालुक्यातील तांबवे गावातील ५० कुटुंबातील २०७ व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडं व नातेवाईकांकडं ठेवण्यात आलं आहे. कराड येथील ४२ कुटुंबातील १६३ व्यक्तींना नगरपालिका शाळा क्र. २,३,४,११ येथे, नांदगाव येथील १२ कुटुंबातील ४९ व्यक्तींना, काले येथील १५ कुटुंबातील ५८ जणांना तर, टाळगाव येथील ३० कुटुंबातील ११८ व्यक्तींना गावातील जवळच्या लोकांकडे व नातेवाईक यांच्याकडं पाठवण्यात आलं आहे. पोतले येथील १२ कुटुंबातील ५२ व्यक्तींना आनंदराव चव्हाण विद्यालय पोतले व जानुबाई मंदिर पोतले येथे, येणके येथील तीन कुटुंबातील १३ व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे, आणे येथील आठ कुटुंबातील ३० व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आलं आहे. वाई तालुक्यातील जांभळी येथील तीन कुटुंबातील १४ व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आलं आहे. तर, महाबळेश्वर तालुक्यातील दरे, धावली, भेकवली, येरणे येथील नऊ कुटुंबातील ३० व्यक्तींना जवळच्या नातेवाईकांकडे, पाटण तालुक्यातील पाटण शहरातील पाच कुटुंबातील २१ व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UFSzUY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.