Type Here to Get Search Results !

पटोलेंनी सिस्टिम समजून घ्यावी, पाळतीच्या आरोपांवर राष्ट्रवादी भडकली

मुंबई: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं आज उत्तर दिलं आहे. 'पटोले यांनी योग्य माहितीअभावी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी आधी व्यवस्थेची माहिती करून घ्यावी,' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी हाणला आहे. (NCP Leader Refutes 's Allegations) लोणावळा इथं पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना नाना पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला होता. तसंच, आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोपही केला होता. 'आयबीचा रिपोर्ट रोज सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे जातो. बैठका, आंदोलन कुठे सुरू आहेत, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचा सुद्धा रिपोर्ट गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,' असं पटोले म्हणाले होते. त्यांच्या या आरोपांमुळं खळबळ उडाली होती. महाविकास आघाडीत नक्कीच काहीतरी बिनसलंय अशी चर्चा होती. वाचा: या सगळ्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पटोलेंच्या आरोपांवर आपली भूमिका मांडली. 'पटोले यांनी माहितीअभावी हे आरोप केले आहेत. राज्यात सरकार कोणाचंही असो, राजकीय पक्षांच्या सभा, मोठ्या नेत्यांचे दौरे, मंत्र्यांचे दौरे याची माहिती पोलीस यंत्रणेला ठेवावी लागते. त्यासाठी असलेली विशेष शाखा याबाबत गृहखात्याला माहिती देत असते. ही माहिती कुठल्याही पक्षाशी संबंधित असू शकते. कुणा एका पक्षाविषयी नसते. पटोलेंना हे माहीत नसेल तर त्यांच्या पक्षात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून त्यांनी ही माहिती घेतली पाहिजे,' असा चिमटा मलिक यांनी काढला. 'पटोले यांच्या कार्यक्रमाला, त्यांच्या नेत्यांना, काँग्रेसच्या मंत्र्यांना पोलीस सुरक्षा नको असेल तर त्यांनी तसं सांगावं. त्याबाबत गृहखातं निर्णय घेऊ शकतं,' असंही मलिक यांनी स्पष्ट केलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3k75PMG

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.