Type Here to Get Search Results !

पायाला फोड आले असताना पक्षाचा प्रचार केला; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा भावूक

मुंबईः ' निवडून आले, त्या निवडणुकीला मी एकटीच होते. आमच्या जिल्ह्यात आमदार नव्हता. माझ्या पायाला फोड आले होते तेव्हा मी पायाला पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला,' अशी आठवण भाजप नेत्या () यांनी सांगितली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर यांना स्थान न मिळाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. खातेवाटप झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांना अभिनंदनाचं ट्वीट न केल्यामुळं या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. या सर्व चर्चांनंतर पंकजा मुंडे यांना डावलण्यात येण्याची चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. या सर्व चर्चांवर आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. नाराजीच्या चर्चांवर बोलत असताना पंकजा मुंडे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. वाचाः 'प्रीतम मुंडेंनी दोनदा खासदारकीची निवडणूक जिंकूनही त्यांना डावलण्यात आलं का?, या प्रश्नांवर उत्तर देताना पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंसोबतची आठवण सांगितली. ही आठवण सांगताना त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रीतम मुंडे वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळं त्या भरघोस मतांनी जिंकणारच होत्या. पण आत्ता जी निवडणुक झाली त्या निवडणुकीत त्या स्वतःच्या मेरिटवर जिंकल्या. तरीही प्रीतम मुंडे निवडणुकीच्या उमेदवार आहेत की नाही इथून चर्चा होते,' असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. वाचाः 'खासदारकीची शपथ घेण्याआधीच गोपीनाथ मुंडेंचे अपघाती निधन झाली. मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि ३ जूनला गेले. हे केवढं मोठं घोर दुःख आहे. प्रीतम मुंडे राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या. त्या लोकांना शांत करण्यासाठी आल्या,' असं सांगतानाच गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी त्यांना गहिवरुन आलं होतं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hTdpaZ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.