Type Here to Get Search Results !

इथोपियाचं मेडीकल लायसन्स देतो असं सांगितलं आणि...

म. टा. प्रतिनिधी । इथोपिया देशात वैद्यकीय व्यवसाय करण्याचा वैद्यकीय परवाना (मेडीकल लायसन्स) मिळवून देण्याच्या आमिषाने ३० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( couple dupes Mumbai man for Rs 30 lakh promising Ethiopia license) याबाबत केदार गणला (वय ५२, रा. मुंबई ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सोमेंद्र सारस्वत (वय ४३) आणि नेहा सारस्वत (दोघेही रा. जयरास कॉप्लेक्स, बोपोडी ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोपोडी येथे २०१८ ते जुलै २०२१ कालावधीत ही घटना घडली. वाचा: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार आणि सारस्वत दाम्पत्याची मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दाम्पत्याने केदार यांना इथोपिया देशातील कॉन्सलेट यांच्यासोबत ओळख असल्याचे सांगितले. तसेच, त्या देशात त्यांच्या अधिपत्याखाली दहा ते बारा टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहेत. या देशात वैद्यकीय व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे. या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी मेडीकल लायसन्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून २० लाख रुपये आरटीजीएस पद्धतीने घेतले. त्यानंतर काही दिवसांनी आणखी १० लाख रुपये घेतले. मात्र, २०१८ पासून जुलै २०२१ पर्यंत सारस्वत दाम्पत्याने त्यांना इथोपिया देशातील मेडिकलचे लायसन्स मिळवून दिले नाही. त्यानंतर केदार यांनी त्यांच्याकडे रक्कम मागितली असता, सारस्वत दाम्पत्याने त्यांना धनादेश दिला. मात्र, त्यांनी दिलेला धनादेश वठला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर केदार यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी खडकी पोलिस अधिक तपास करत आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3k0TvO0

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.