मुंबई: मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त () त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री यांच्यासह महाविकास आघाडीतील बहुतेक नेते व मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक करत त्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे. उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. 'उद्धवजींच्या रुपानं राज्याला आणि महाविकास आघाडीला सक्षम, समर्थ, सर्वांना सोबत घेऊन जाणारं कुशल नेतृत्वं लाभलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली करोनाविरुद्धचा लढा आपण निश्चितच जिंकू. पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील, जगातील अव्वल राज्य बनवू, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. गृहनिर्माण मंत्री यांनीही मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 'खडतर परिस्थितीत राज्याची धुरा समर्थ आणि यशस्वीपणे सांभाळत, कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्रीसाहेब आपली जबाबदारी अतिशय ताकदीनं पार पाडत आहेत. याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिमान वाटतो. त्यांना दीर्घायुष्य मिळो, उत्तम आरोग्य लाभो,' अशा शुभेच्छा आव्हाड यांनी दिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, असं फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वाचा: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर व मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतरचा उद्धव ठाकरेंचा हा दुसरा वाढदिवस आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. तसंच, शिवसैनिक व हितचिंतकांनाही तशा सूचना दिल्या आहेत. असं असलं तरी सोशल मीडियातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा विशेष लेख:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zBqLA7