Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; संजय राऊत यांच्या ट्वीटची जोरदार चर्चा

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. राज्यात नुकताच आलेला महापूर व करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. मात्र, वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केवळ राजकीयच नव्हे, सर्वच क्षेत्रांतून त्यांचं अभिष्टचिंतन केलं जात आहे. (Sanjay Raut Greets CM Uddhav Thackeray on his birthday) उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार, खासदार यांनीही आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्वीटची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी घडत असलेल्या घडामोडींचा तो व्हिडिओ आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल ठामपणे सुरू असल्याचा ग्वाही देणारा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओसोबतच संजय राऊत यांनी उद्धव यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मागील अडीच दशकातील शिवसेनेच्या प्रत्येक वाटचालीचे संजय राऊत हे जवळचे साक्षीदार आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांना ठामपणे साथ देणाऱ्या नेत्यांपैकी संजय राऊत हे एक आहेत. त्या नात्याचं व मित्रत्वाचं प्रतिबिंब राऊत यांनी उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्वीटमध्ये पडलं आहे. 'अखंड साथ. अतूट नाते...' असं राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, तो दिवस लवकरच उगवेल,' असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. वाचा विशेष लेख:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/370uBq6

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.