Type Here to Get Search Results !

फोटोतले हे रडणारे डोळे तुमचा थरकाप उडवले, काळजाचं पाणी करणारी घटना

बुलडाणा : तालुक्यातील साखळी परिसरात निसर्गाची अवकृपा झाली असून गेल्या आठ दिवसांपासून पाऊस पडत नाहीये. त्यामूळे पिकांवर किडिंचा प्रादुर्भाव आणि तण वाढत आहे. शेतकरी पीक वाचावे म्हणून जीवाचे रान करत आहेत. त्यातच आठ दिवसांपुर्वी साखळी येथील शेतकऱ्याने तणनाशक फवारणी केल्यामुळे उभे असलेले सोयाबीनचे पीक वाळल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. साखळी येथील अपंग शेतकरी प्रदिप हिवाळे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. यांनी यावर्षी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली. मात्र, दूषित हवामानामुळे शेतातील तन वाढल्यामुळे त्यांनी गावातीलच शाश्वत कृषी केंद्रावरून रॅमसाईड क्रॉपसायन्स कॉर्पोरेशन या कंपनीचे इमिजादम या तणनाशकाची फवारणी केली असता दोन दिवसानंतर याचा उलट परिणाम सोयाबीनवर दिसून आला. यामुळे या बळीराजाच्या डोळ्यातलं पाणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. शेतकऱ्यांचे उभे पीक वाळले. त्यामुळे या शेतकऱ्याने संबंधित कृषी केंद्र मालकाला व कृषी अधिकाऱ्यांना तोंडी तक्रार केली आहे. त्यामुळे आता या अपंग शेतकऱ्याने कृषी केंद्रावर कडक कारवाई करून कृषी केंद्र सील करावे व आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iQvMxY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.