Type Here to Get Search Results !

करोना कुठे आहे?; लग्नाच्या जेवणाची ही पंगत पाहून तुम्हाला धक्का बसेल!

नगर: जिल्ह्यात संसर्ग वाढत असून त्यामागे गर्दी जमवून केले जाणारे हे एक कारण असल्याचे पुढे आले आहे. तरीही लोक यातून बोध घेत नाहीत. शेवगावमध्ये आज दुपारी असाच एक मोठा विवाह समारंभ झाला. सुमारे पाचशे वऱ्हाडींच्या उपस्थितीत लागलेल्या या लग्नात जेवणावळी सुरू असतानाच प्रशासन पोहचलं आणि कारवाईचा बडगा उगारण्यात आला. संयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून मंगल कार्यालय सील करण्यात आले आहे. ( ) वाचा: येथील मिरी रोडवरील ममता मंगल कार्यालय येथे नियम मोडून विवाह सुरू असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली. त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता लग्न विधी पूर्ण होऊन जेवणावळी सुरू होत्या. त्यांनी त्याचे चित्रीकरण सुरू केले. सुरुवातीला याकडे कोणीही लक्ष दिले नाही. बहुतेकजण जेवणावळीत दंग होते. त्यानंतर तहसीलदारांनी चौकशी सुरू केली आणि कारवाईला सुरुवात केली. कारवाई होत असल्याचे लक्षात आल्यावर वऱ्हाडींची एकच धावपळ सुरू झाली. संयोजक कोण आहे, कोणीच सांगायला तयार होईना. आम्ही पाहुणे म्हणून आलो आहोत, असे प्रत्येक जण सांगू लागला. तहसीलदारांनी मग पोलिसांना बोलावून घेतले. त्यांनी वधू-वरांकडे चौकशी केली. त्यानंतर वर आणि वधू पिता समोर आले. वाचा: वधू तालुक्यातील वडुले या गावातील तर वर पैठण तालुक्यातील आहे. लग्न समारंभासाठी केवळ ५० व्यक्तींना परवानगी आहे. मात्र येथे प्रत्यक्षात पाचशेहून अधिक वऱ्हाडी जमले होते. मास्क, सुरक्षित अंतर, करोना सुसंगत वर्तन या नियमांचाही भंग केला जात होता. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या संयोजकांवर म्हणजे वधू-वरांच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गर्दी होऊ न देण्याची आणि दिलेल्या परवानगीतील अटींचे पालन करण्याची जबाबदारी मंगल कार्यलयांचीही आहे. त्यामुळे कार्यालय मालकाला दंड करण्यात आला. याशिवाय करोना परिस्थिती पूर्ण संपेपर्यंत हे मंगल कार्यालय सील करण्यात आल्याचे तहसीलदारांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fbolQR

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.