Type Here to Get Search Results !

नैसर्गिक आपत्तींची मालिका; चिपळूणमध्ये ऊर्जामंत्र्यांनी केली 'ही' मोठी घोषणा

चिपळूण: , महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. यांनी दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे. उघड्यावर असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठीच आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ( ) वाचा: रत्नागिरी जिल्ह्यात २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मुख्यत: चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांत मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना पूर आला व हाहाकार उडाला. यात महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. नितीन राऊत यांनी आज चिपळूण तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पुरामुळे नादुरुस्त झालेले ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश महावितरणला दिले. चिपळूण येथे पुरामुळे नागरिकांचे तसेच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नदीला आलेल्या पुराचा सामना करत, डोंगर दऱ्यांतून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. त्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी प्रत्यक्ष भेटीत कौतुक केले. वाचा: चिपळूण तालुक्यातील खेर्डी, वशिष्ठी नदीपूल परिसर तसेच मुरादपूर येथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या. कोकणात वारंवार नैसर्गिक संकटे येत असल्याने येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचा (एनडीआरएफ) कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, चिपळूणमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप राऊत यांनी केले. अहोरात्र सुरू आहेत दुरुस्तीची कामे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील १९४२ गावे व शहरातील ९ लाख ६० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पुरात काम करून ७ लाख ५३ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा आतापर्यंत सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण १६१७ गावांचा वीज पुरवठा आता सुरळीत झाला आहे. १४ हजार ७३७ रोहित्रे बंद पडली असताना ११ हजार ३६८ रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या ४८९ वीज वाहिन्यांपैकी आता ४०४ वीज वाहिन्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या ६७ वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी ५६ केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रांपैकी एक उपकेंद्र आता सुरू झालेले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2V2ByEL

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.