Type Here to Get Search Results !

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या ५००च्या खाली; 'ही' आकडेवारी देतेय चांगले संकेत

मुंबई: संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा उद्रेक पाहायला मिळाल्यानंतर मुंबईत आता साथ नियंत्रणात येत असून आज दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेपेक्षाही खाली आली आहे. क्षेत्रात आज ४८९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर त्याचवेळी ६४५ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने १० रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा आता १५ हजार ५५४ इतका झाला आहे. ( ) वाचा: मुंबई शहर आणि उपनगरात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या ११ हजारांपर्यंत पोहचली होती. ही रुग्णवाढ पालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारी ठरली होती. त्यात ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा निर्माण होऊन भीषण स्थिती निर्माण झाली होती. या स्थितीवर सर्व यंत्रणांनी मिळून नियोजनबद्धपणे मात केली असून गेल्या महिनाभरापासून सातत्याने करोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. मुंबईतील स्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून रुग्णवाढीचा दर ०.०८ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ८०२ दिवसांवर जाऊन पोहचला आहे. वाचा: मुंबईत गेल्या २४ तासांत ४८९ नवीन रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही महिन्यांतील ही निचांकी रुग्णसंख्या आहे. आज दिवसभरात मुंबईत ६४५ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले असून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आता ७ हजार ९४७ पर्यंत खाली आली आहे. मुंबईत आज ३० हजार ७३७ कोविड चाचण्या करण्यात आल्या. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये १३ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ६५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती २४ तासांत बाधित रुग्ण - ४८९ २४ तासात बरे झालेले रुग्ण - ६४५ बरे झालेले एकूण रुग्ण - ६९९३४१ बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९६% एकूण सक्रिय रुग्ण- ७९४७ रुग्ण दुपटीचा कालावधी- ८०२ दिवस ( २८ जून ते ०४ जुलै)- ०.०८ % वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jMCM10

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.