Type Here to Get Search Results !

राजेश साप्ते यांनी आत्महत्या का केली?; राम कदमांवर राष्ट्रवादीचा थेट आरोप

मुंबई: 'गोरेगावच्या येथे भाजप आमदार यांच्या नेतृत्वाखाली जे गुंडाराज सुरू आहे त्यानेच कला दिग्दर्शक यांचा बळी घेतला असून खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचायचं असेल तर राम कदम यांना ताबडतोब अटक केली पाहिजे', अशी मागणी काँग्रेसच्या प्रवक्त्या यांनी केली आहे. ( ) वाचा: विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणात राम कदम यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. संपूर्ण घटनाक्रम सांगत चव्हाण यांनी गोरेगावच्या चित्रनगरीत कशाप्रकारे गुंडाराज सुरू आहे याचे दाखले दिले आहेत. 'कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. राजेश साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोटमध्ये ज्यांची नावे लिहिली आहेत, त्यांनी गेली अनेक वर्षे सुमारे ४५ हजारांवर कामगारांना वेठीस धरले आहे. लॉकडाऊन काळात सलमान खान, यशराज फिल्म्स आणि इतर काही निर्मिती संस्थांनी कामगारांसाठी ५० कोटी रुपये मदत म्हणून दिले होते. मात्र संबंधित युनियनने त्यातील २ कोटी देखील गरीब कामगारांना मिळू दिले नाहीत. गोरेगावची संपूर्ण चित्रनगरी या लोकांनी काबीज केली असून तिथे गुंडाराज चालले आहे. या सर्वांचे नेतृत्व राम कदम करत असून त्यांना ताबडतोब अटक झाली तरच खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येईल', असे चव्हाण म्हणाल्या. वाचा: नृत्य, अॅक्शन, म्युझिक अशा विविध क्राफ्टची ही युनियन आहे. २०१५ मध्ये राम कदम या युनियनचे चेअरमन झाले. तेव्हापासून राकेश मौर्या, गंगेश्वर श्रीवास्तव, अम्रिश श्रीवास्तव, अशोक दुबे, बी.एन. तिवारी, दीपक श्रीवास्तव यांची गोरेगाव चित्रनगरी येथे दादागिरी सुरू झाली आहे. राम कदम यांनी वेळोवेळी आपलं राजकीय वजन वापरून या गुंडांना वाचवलं आहे. या सर्वांचे कायदेशीर सल्लागार हे किरीट सोमय्या असून या गुंडांची गुन्ह्याची प्रकरणे दाबून टाकण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात गृहखात्याचा गैरवापर केला गेल्याचा गंभीर आरोपही विद्या चव्हाण यांनी केला. या युनियनशी माझा आता काहीही संबंध नाही, असे राम कदम सांगत असले तरी चित्रनगरीतील गुंडांना कदम यांचंच पाठबळ असून साप्ते यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या गुन्हेगारांपर्यंत पोहचायचं असेल तर राम कदम यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. राजेश साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी माझं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, असं लिहिलं आहे. ही बाब मन हेलावून टाकणारी असून चित्रनगरीतील गुंडाराज संपवण्यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TGhNlA

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.