Type Here to Get Search Results !

'शरद पवारांच्या बदनामीची सुपारी फडणवीसांनीच पडळकरांना दिलीय'

कोल्हापूर: ज्येष्ठ नेते यांच्याविरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या आमदार यांना माजी मुख्यमंत्री यांची फूस असल्याचा आरोप करताना त्यांना आवरा, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री यांनी दिला. दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा डाटा केंद्र सरकारने द्यावा यासाठी येत्या अधिवेशनात ठराव करणार असून प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ( ) वाचा: कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, सत्ता गेल्याने नेते सैरभैर झाले आहेत. सत्ता मिळत नाही म्हटल्यावर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. त्यासाठी ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली. एखाद्या सत्ताधारी मंत्र्याविरोधात विरोधी पक्षाच्या बैठकीत असा ठराव होण्याचा देशातील हा पहिलाच प्रसंग असावा. केंद्रीय सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे. यावरून सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याचे स्पष्ट होत आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला. हा डाव जनता सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. वाचा: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बदनाम करण्याची सुपारीच आमदार पडळकरांना देण्यात आली आहे. त्यांचा बोलविता धनी माजी मुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यांचीच पडळकरांना फूस आहे असा आरोप करताना मुश्रीफ म्हणाले, आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा डाव खपवून घेतला जाणार नाही. जरंडेश्वर साखर कारखाना निविदा काढून विकत घेतला आहे. यामुळे यामध्ये कोणतेही काळेबेरे झाले नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, केवळ सरकारला अस्थिर करण्यासाठी हा कारखाना जप्त करण्याचा निर्णय झाला आहे. तीन पक्षांच्या नेत्यांना भीती घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण अशा प्रकारांना आम्ही घाबरणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. वाचा: केंद्राच्या नाकर्तेपणामुळेच न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतची फेरयाचिका फेटाळल्याचा आरोप करताना ते म्हणाले, आधीच्या फडणवीस सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाची घोर फसवणूक केली आहे. ओबीसी आरक्षणाचा डाटा केंद्र सरकार देत नाही. त्यासाठी राज्याच्या अधिवेशनात ठराव करण्यात येणार आहे. प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील. युती सरकारच्या काळात झालेला देवगड ते निपाणी रस्ता अतिशय नित्कृष्ठ झाला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची सरकारने चौकशी करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xcdahW

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.