Type Here to Get Search Results !

मुंबै बँक: कर नाही तर डर कशाला; दरेकर यांनी 'ते' आरोप फेटाळले

मुंबई: 'मुंबै बँकेत १२३ कोटींचा घोटाळा, हा आकडा कुठून आणला तेच कळत नाही. केवळ हवेत तीर मारले जात आहेत. राज्याचा विरोधी पक्षनेता असल्याने माझ्यावर दबाव टाकण्यासाठी व मला अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. मात्र मी कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. एकदाच काय शंभर वेळा चौकशीला सामोरा जायला तयार आहे. कर नाही तर डर कशाला', अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि मुंबै बँकेचे अध्यक्ष यांनी प्रतिआव्हान दिले आहे. ( ) वाचा: प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबै बँकेवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. 'प्रत्येक बाबतीत आवाज उठवणारा दरेकर आता कुठे गायब झाला आहे, असे विचारले जात आहे, पण मी कुठेही गेलेलो नाही', असे नमूद करताना मुंबै बँकेवर जे आरोप केले जात आहेत त्यामागे केवळ आणि केवळ राजकारण आहे. आमदार हे माझे राजकीय विरोधक आहेत आणि सुर्वे हे राजकीय सूडापोटी चौकशी करून काही हाती लागतंय का हे बघत आहेत. यांच्याकडून जाणीवपूर्वक आमची चौकशी लावून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. पण यातून काहीच साध्य झालं नाही, असे दरेकर यांनी सांगितले. वाचा: मुंबै बॅंक ही अ वर्ग असणारी बँक आहे. विधिमंडळाच्या सभागृहात बँकेचे कौतुक झालेले आहे. नाबार्डने देखील आमचे कौतुक केले आहे. पण सध्या ज्या काही चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत त्याने बँकेची बदनामी होत आहे. याबाबत अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे, असेही दरेकर यांनी नमूद केले. बँकेविरोधात ज्या याचिका दाखल केल्या होत्या त्या कोर्टाने फेटाळल्या आहेत. जे जे आरोप आमच्यावर झाले त्या प्रत्येकाला आम्ही उत्तर दिले आहे, असे सांगत तांत्रिक बाबीही दरेकर यांनी समोर ठेवल्या. मला जितकं अडचणीत आणण्याचा प्रयत्न कराल तितका मी आक्रमकपणे प्रश्न मांडत राहीन. दबावाला घाबरणारा मी नाही. तुम्ही कोणतीही चौकशी करा, मी त्यास सामोरा जायला तयार आहे, असे स्पष्ट करताना बँकेवरचा विश्वास ग्राहकांनी कायम ठेवावा. जनतेच्या आणि सहकाराच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे, असेल आणि राहील, असे आवाहन दरेकर यांनी केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jAZOHX

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.