Type Here to Get Search Results !

रायगडमध्ये बचावकार्य सुरू; आतापर्यंत ४४ मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले

महाड: कोकणातील अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यात व पोलादपूरसह तब्बल सहा ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसानं काहीशी उसंत घेतल्यानंतर आता जिल्ह्यात मदत व बचावकार्याला वेग आला आहे. आतापर्यंत दोन ठिकाणी दरडीच्या ढिगाऱ्यांखालून ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. दरड कोसळून जखमी झालेल्या ३५ जणांवर सध्या उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. एका ठिकाणी बचावकार्य अजूनही सुरूच असून किमान ५० जण ढिगाऱ्याखाली असण्याची भीती घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36YmY3q

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.