म. टा. प्रतिनिधी । सांगलीत नववधूने अनोखा गृहप्रवेश केला. महापुराच्या पाण्यातूनच नवदाम्पत्य बोटीने घरी पोहोचले. संकटातही हौस पुरी करणाऱ्या या नवदाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगलीतील गावभाग परिसरात हा प्रकार घडला. सांगली शहराला गेल्या चार दिवसांपासून महापुराचा विळखा बसलाय. जवळपास निम्मे शहर पाण्याखाली गेले आहे. जिल्ह्यात सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. पुराच्या धास्तीने हजारो लोकांची तारांबळ उडाली असताना एका नवदाम्पत्याने थेट पुरातूनच आपल्या लग्नाची वरात काढून लक्ष वेधले. एकीकडे आपल्या कुटुंबाची चिंता पूरग्रस्त सांगलीकरांना लागलेली असतानाच हौसेला काही मोल नसतं असाच प्रकार पाहायला मिळाला. वाचा: सांगलीतल्या गावभाग मध्ये राहणाऱ्या एका तरुणाचा नुकताच विवाह झाला. तरुणाच्या घरात पुराचे पाणी आले तरीही त्यांनी लग्नाचा मुहूर्त चुकवला नाही. सुरक्षित स्थळी पोहोचून नातेवाईकांनी शुभमंगल उरकलं. यानंतर गृहप्रवेश करण्यासाठी नवदाम्पत्यांनी थेट बोटीतून प्रवास करीत आपले घर गाठले. लग्नाची वरात चक्क बोटीतून काढली. सध्या नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मारुती चौक येथे सगळी दुकाने व गाळे पाण्यात गेले असताना लग्नाची वरात संकल्प फाउंडेशनच्या बोटीतून नेली. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kXC29F