पुणे : राज्यात मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेकांचे बळीही घेतले आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे दुर्घटनांबरोबरच साथीचे आजारही पसरण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेत राज्याचे आरोग्य मंत्री यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज पुणे जिल्ह्यातील दौंड येथे बोलत होते. पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यात, तालुक्यांत आणि गावांवर सरकारचे लक्ष असून गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करून ठेवण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यातील पूरस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे सांगतानाच नागरिकांना लागणारी सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असे टोपे यांनी म्हटले आहे. एकूण परिस्थिती लक्षात घेता आरोग्यविषयक सर्व साहित्य, औषधांची कुमक पुराचा फटका बसलेल्या गावांसाठी पाठवण्यात आली आहे. यासोबतच मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात येत आहेत, असे टोपे यांनी सांगितले. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये आतापर्यंच १२९ पावसाचे बळी दरम्यान, गेल्या काही दिवसांत पावसामुळे तब्बल १२९ नागरिकांचा बळी गेला असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून अशा दुर्घटनांमुळे मृतांची संख्या वाढली असेही थोरात म्हणाले. वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये राज्यात आज ८९ मृत्यू दरम्यान, अतिवृष्टीमुळे राज्यात विविध ठिकाणी अनेक दुर्घटना घडल्या असून या दुर्घनांमुळे आज दिवसभरात एकूण आतापर्यंत ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये अपरांत हॉस्पिटलमधील कोव्हिड सेंटरमध्ये ८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर रायगड तालुक्यातील महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील आंबेघर येथे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाई येथे २ महिलांचा देखील मृत्यू झाला आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ztQz0R