Type Here to Get Search Results !

मानापमान नाट्यानंतर पुण्याबाबत बैठक; अजित पवारांनी दिला 'हा' शब्द

मुंबई: हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री यांनी आज दिले. दरम्यान, पुण्याचे महापौर या बैठकीला उपस्थित नव्हते. या बैठकीचे आमंत्रण आपल्याला नव्हते असा त्यांचा दावा होता. मात्र, मोहोळ यांना उपमुख्यमंत्री कार्यालयाने पाठवलेल्या पत्राची प्रतच राष्ट्रवादीनं सोशल मीडियात शेअर करत त्यांचा दावा खोडून काढला. त्यामुळे ही बैठक चांगलीच चर्चेत राहिली. ( ) वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. पुणे महापालिका हद्दीतील म्हाडाच्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या, तसेच हद्दीत समाविष्ट गावांमधील शाळा, अंगणवाड्या पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे पाणीयोजनांचे हस्तांतर तसेच पुणे महानगरपालिका विकास आराखड्यातील बालग्राम प्रमाणेच अग्रसेन शाळेची जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केली. पुणे शहराच्या जलद व सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी बैठकीत केला. वाचा: बैठकीला ग्रामविकासमंत्री , गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार सुनील टिंगरे, पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार (व्हिसीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (व्हिसीद्वारे) आदींसह वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. वाचा: आमंत्रणावरून मानापमान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे या बैठकीला उपस्थित नव्हते. 'मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे', असे ट्वीट करत मोहोळ यांनी आमंत्रण नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र मोहोळ यांना या बैठकीचं आमंत्रण होतं, असं पुराव्यानिशी राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री कार्यालयातून मोहोळ यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची प्रत राष्ट्रवादीनं सोशल मीडियात शेअर केली. राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष यांनी त्याचा दाखला देत मोहोळ यांचे आरोप फेटाळून लावले. यामुळेही ही बैठक चर्चेत राहिली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3weyqCt

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.