Type Here to Get Search Results !

तहसील कार्यालयातील 'या' कारवाईने नागपुरात खळबळ

नागपूर: शेतीचा फेरफार करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरकडून सात हजाराची लाच घेणाऱ्या व कोतवालासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी रंगेहाथ अटक केली. मौद्यातील तहसील कार्यालयात एसीबीने ही कारवाई केली. या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ( ) वाचा: तलाठी (वय ३१), कोतवाल किशोर बिसन वानखेडे (वय ५२) आणि व लक्ष्मीनारायण रामचंद्र पोटभरे (वय ४१) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. भंडारा येथील डॉ. घरडे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. घरडे यांनी मौद्यातील येथे शेती खरेदी केली आहे. फेरफार करण्यासाठी त्यांनी तारस्यातील तलाठी कार्यालयात अर्ज केला. परंतु, फेरफार नोंदणी झाली नाही. त्यांनी तलाठी पडवार यांच्याशी याबाबत संपर्क साधला. तेव्हा फेरफार नोंदणीसाठी आठ हजार रुपयांची मागणी पडवार यांनी केली. घरडे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्याआधारे पुढील कारवाई करण्यात आली. वाचा: एसीबीच्या अधीक्षक , अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक महेश चाटे, निरीक्षक योगेश्वर पारधी, संजय कुरंजेकर, रोशन गजभिये, राजेंद्र करूडकर, कोमल बनकर, सुनील हुकरे, कुणाल कडव व दिनेश धार्मिक यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात सापळा रचला. पडवार यांनी वानखेडे व पोटभरे यांना लाच घेण्यासाठी पाठविले. लाच घेताच एसीबीच्या पथकाने आधी दोघांना व नंतर पडवार यांना अटक केली. तिघांविरुद्ध स्टेशनमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/362yD0A

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.