Type Here to Get Search Results !

tauktae cyclone : सिंधुदुर्गात समुद्र खवळला, ४५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाहा वादळाची भीषणता

सिंधुदुर्ग : अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोक्ते चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे. कोकण किनारपट्टीवरील सिंधुदूर्गला चक्रीवादळाचा प्रभाव हळूहळू जाणवू लागलेला आहे. त्याची तीव्रता दुपारनंतर अधिक होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने किनारपट्टीच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दोन दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्गच्या किनारपट्टीला जाणवू शकतो. रात्री 2 .30 ते 3 च्या सुमारास झालेल्या मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे झाडांची पडझड आणि घरांचे नुकसान झाल्याचंही पाहायला मिळेल. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट असतानाच हे नवं संकट कोकणला सतावत आहे. सगळ्यात भयंकर म्हणजे या चक्रीवादळाचा फटका कोविड सेंटरला बसू नये म्हणून विजमंडळाला वीज पुरवठ्याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सेंटरवर जनरेटरची व्यवस्था करत आरोग्य यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, अरबी सागरात तयार झालेलं आणि वेगाने घोंगावत असलेलं 'तौत्के' चक्रीवादळ येत्या १२ तासांत अक्राळ-विक्राळ रुप धारण करू शकतं, अशी धोक्याची सूचना हवामान विभागानं दिली आहे. मंगळवारी (१८ मे) सकाळपर्यंत हे वादळ गुजरातच्या तटाला धडक देण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. या चक्रीवादळाला 'तौत्के' हे नाव म्यानमारकडून देण्यात आलं आहे. भारतीय तटावर यंदाच्या वर्षात धडणारं हे पहिलंच चक्रीवादळ असेल. अरबी समुद्रात दबाव क्षेत्र भारत हवामान विज्ञान विभागाच्या म्हणण्यानुसार, दक्षिण अरब सागर आणि लक्षद्वीप क्षेत्रात गुरुवारी चक्रीवादळानं दबाव निर्माण केला आहे. शनिवारी पहाटेपर्यंत या दबावात आणखीन वाढ होईल आणि त्यानंतर पुढच्या २४ तासांत चक्रीवादळ भयंकर स्वरुप धारण करू शकतं. मुंबईला चक्रीवादळाचा धोका हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळतील तर यावेळी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी महत्त्वाचं काम नसल्यास घराबाहेर जाणं टाळावं. मुंबईसह अनेक उपनगरांत आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SHpK9l

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.