Type Here to Get Search Results !

coronavirus in maharashtra latest updates करोना: आज राज्यात ४२ हजारांवर नवे रुग्ण, ८५० मृत्युमुखी

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ४२ हजार ५८२ नव्या बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ४६ हजार ७८१ इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी घट झाली असून असून हा फरक ४ हजार १९९ इतका आहे. तर आज एकूण ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५८ हजार ८०५ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ३३ हजार २९४ वर आली आहे. (coronavirus see latest updates maharashtra registered 42582 new cases in a day with 54535 patients recovered and 850 deaths today) आज राज्यात एकूण ८५० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ८१६ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४६ लाख ५४ हजार ७३१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३४ टक्क्यांवर पोहोचले आहे. पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ३३ हजार १२९२९४ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १ लाख १ हजार १८१ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ३६ हजार ३३८ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ३० हजार ९२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४५ हजार ९९६ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ६१७ इतकी आहे. या बरोबरच अहमदनगरमध्ये २८ हजार ८६२ इतकी आहे. औरंगाबादमध्ये ८ हजार ८३९, नांदेडमध्ये ही संख्या ४ हजार ८६८ इतकी आहे. जळगावमध्ये १० हजार ९११, तसेच तर रायगडमध्ये एकूण ८ हजार ७८४ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या १० हजार ९३७, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजार ९१२ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ६७९ इतकी आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hrIgNk

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.