Type Here to Get Search Results !

corona positive: अंबरनाथमधून चिंता वाढवणारी बातमी; परदेशातून आलेल्या 'त्या' मुलीचा करोना रिपोर्ट आला

अंबरनाथ: कर्नाटकात दोन रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यात सतर्कता बाळगण्यात येत आहे. अशात अंबरनाथमधून चिंता वाढवणारे वृत्त येत आहे. ते म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शहरात आपल्या कुटुंबासह विदेशात जाऊन परत आलेल्या एका सात वर्षीय मुलीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ( updates corona report of a girl from abroad at ambernath in thane district has come positive) ही मुलगी आपल्या आई-वडिलांसह रशिया या देशात फिरायला गेली होती. रशियातून हे कुटुंब २८ नोव्हेंबर या दिवशी अंबरनाथला परत आलं. मात्र, काही दिवसांनी मुलीला करोनाची लक्षणं जाणवू लागली. तिची करोना चाचणी केल्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. मात्र, मुलीच्या वडिलांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून तिच्या आईचा रिपोर्ट मात्र अजूनही आलेला नाही. क्लिक करा आणि वाचा- विशेष म्हणजे या मुलीची आई दोन दिवस आपल्या कार्यालयात देखील गेलेली होती. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. मुलीला ओमिक्रॉन आहे का? होणार तपासणी या मुलीला ओमिक्रॉनचा धोका आहे का हे पाहण्यासाठी मुलीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ही मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांना घरातच विलगीकरण्यात ठेवण्यात आले आहे. हे कुटुंब धोकादायक स्थितीत असल्याने हे कुटुंब जिथं राहतं ती इमारत सील करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- गेल्या महिन्याभरात परदेशातून महाराष्ट्रात आलेल्या लोकांपैकी २८ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली असण्याची शक्यता लक्षात घेता त्यांची तपासणी करण्यात येत आहे. या संशयितांपैकी मुंबईत १० जण आहेत. या सर्वांचे रिपोर्ट असे आले आहेत. आता त्यांची ओमिक्रॉनसाठी एस जिन चाचणी करण्यात आली आहे. त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे किंवा नाही हे पुढील आठवड्यात कळणे अपेक्षित आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rwFco5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.