Type Here to Get Search Results !

तो ओमिक्रॉनग्रस्त डोंबिवलीकर ८ महिने होता जहाजावर, म्हणूनच...

डोंबिवली: राज्यातील पहिला ओमिक्रॉनचा (Omicron) रुग्ण डोंबिवलीत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. हा ३३ वर्षीय तरुण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून दुबई आणि दिल्लीमार्गे कल्याण डोंबिवलीत आला. त्याच्या करोना चाचणीत तो पॉझिटीव्ह असल्याचं आढळल्यानंतर त्याची ओमिक्रॉनसाठी तपासणी करण्यात आली. त्यात त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र, हा तरूण अजूनही करोना प्रतिबंधक लसीपासून वंचित असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचं कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे यांनी सांगितले आहे. ( positive young man from dombivli had been working on a ship for 8 months so was unable to get the corona vaccine) क्लिक करा आणि वाचा- आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ओमिक्रॉनग्रस्त डोंबिवलीकर तब्बल ८ महिने जहाजावर काम करत होता. तो सहा महिन्यांसाठी समुद्रात असल्याने त्याला करोना प्रतिबंधक लस घेताच आली नाही. लस न घेतलेल्या हा तरुण आफ्रिकेतून येताना ओमायक्रॉन घेऊन आला आहे. ओमिक्रॉनची लागण झालेला हा डोंबिवलीतील ३३ वर्षीय तरुण २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण अफ्रिकेतून आला. तो ६ एप्रिलपासून जहाजवर काम करत होता. सतत जहजावर असल्याने त्याला लस घेणं शक्य झालं नाही अशी माहिती विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- प्रसंगावधान राखत स्वत:ची, कुटुंबाची घेतली काळजी मात्र या तरुणाने स्वतःची आणि आपल्या परिवाराची योग्य प्रकारे काळजी घेतली आहे. तो मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्याच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांने लगेच घरी कळवले आणि आपल्या सर्व कुटुंबीयांना नातेवाईकाच्या घरी पाठवले. त्यानंतर त्याने स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं, अशी माहिती आयुक्त सू्र्यवंशी यांनी दिली. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ew3B0Q

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.