Type Here to Get Search Results !

अमरावतीकरांसाठी चिंता वाढली, जिल्ह्यात करोनाचा शिरकाव, पाहा किती आहे नवे रुग्ण?

अमरावती : राज्यभरात सध्या ओमिक्रोन या नव्या व्हायरसचे रुग्ण आढळत असताना अशातच अमरावतीकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात ९ नवे करोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. ( 9 newly infected were found in district) जिल्ह्यात सण उत्सव संपल्यानंतर आता संपूर्ण बाजारपेठा पूर्णपणे खुल्या झाल्या आहेत. एसटी महामंडळाचा संप सुरू असला तरी खाजगी वाहनाने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. अशातच जिल्ह्यात दिवसा गणित कोरूना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. देशासह राज्यात सध्या ओमिक्रोन या नव्या आजाराने हातपाय पसरायला सुरुवात केली अशातच जनजीवन पूर्वपदावर येत असतांना अमरावती जिल्ह्यात करोनाचे नव्याने नऊ रुग्ण आढळले आहेत या रुग्णांमधला व्हेरिएंट कुठला यावर आता वैद्यकीय तज्ञ अंदाज लावत आहे. अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात ९ नवे करोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या ९६ हजार १९२ झाली. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीची ठिकाणे जाणे टाळावे, मास्कचा उपयोग करावा, सतत हात धुवावे व करुणा नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (amravati corona news today 9 newly infected corona patients were found in district) (amravati corona news today 9 newly infected corona patients were found in district)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pD3URh

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.