Type Here to Get Search Results !

राज्यात आधार कार्डचा महाघोळ, तब्बल ९३.४८ लाख विद्यार्थ्यांचे क्रमांक जुळेनात

हिंगोली : राज्यात पटसंख्या व एका शाळेतील विद्यार्थ्यांची नावे दुसऱ्या गावातील शाळांमधून दिसू नयेत यासाठी सरल प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांनची आधार नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत १.७७ कोटी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झाली. मात्र त्यापैकी तब्बल ९३.४८ लाख विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक जुळत नसल्याचे तपासणीमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळें शासनाच्या मूळ उद्देशाला खो बसत आहे. राज्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढून दाखवणे, गावातील इतर शाळांतील विद्यार्थ्यांची नावे खाजगी शाळेमध्ये ही असणे, एकाच विद्यार्थ्याचे नाव दोन ठिकाणीं असल्याचे प्रकार उघडू लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा मध्ये अडचणी येऊ लागल्या तर शिष्यवृत्ती व इतर योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ देणे कठीण होऊ लागले होते. वर्षापूर्वी शाळांमधून विद्यार्थी तपासणीच्या वेळी विद्यार्थ्यांची पळवापळवी झाल्याचे प्रकार हि झाले आहेत. यावर उपाययोजना म्हणून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची सरल संगणक प्रणालीमध्ये नोदणी करून त्याचे आधार कार्ड नोंदविण्याच्या सूचना समग्र शिक्षा अभियान कक्षाकडे दिल्या होत्या. त्यानुसार मागील एक वर्षापासून शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक लिंक करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, आत्तापर्यंत राज्यात सरल प्रणाली मध्ये २.१७ कोटी विद्यार्थ्यांची नोंदनी झाली असून, त्यापैकी १.७७ कोटी विद्यार्थांचे आधार क्रमांकाची नोंदणी झाली. माञ आधार क्रमांकाच्या नोंदणीमध्ये असंख्य त्रुटी अधळल्या. यावेळी वरीष्ठ कार्यालयाकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये याबाबी उघड झाल्या आहेत. सरल प्रणाली मध्ये नोंदणी झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी अद्याप ४० लाख विद्यार्थ्यांनची आधार नोंदणी बाकी आहे. या शिवाय आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थांच्या नोंदणी मध्ये मोठ्या प्रमानावर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त , समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक यांच्यासह शिक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीत या त्रुटी बाबांत चर्चा झाली आहे. त्या नुसार आधार नोंदणी मधील त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत . माञ शाळा स्तरावर उभारण्यात आलेल्या आधार नोंदणीला त्रुटीमुळे शासणाच्या मूळ उद्देशालाच खो बसू लागल्याचे चित्रं आहे. या प्रकारानंतर प्रकल्प संचालक कार्यालयाने राज्यांतील सर्व शिक्षण विभाग यांना पत्र लिहून त्रुटी दूर करणे तसेच शाळा स्तरावर माहिती तपासणीचे नियोजन करावे यामध्ये जिल्हा व तालुकास्तरावरील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, संगणक ऑपरेटर, समन्वयक , साधन व्यक्ती, विशेष साधन व्यक्ती , यांच्यासह इतरांनी एका महिन्यात प्रत्येकी किमान शंभर विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y9Hv1W

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.