Type Here to Get Search Results !

अरेरे! मैदानात पाण्याने भरला होता मोठा खड्डा; तेथे दोघे पोहायला गेले आणि...

ठाणे : पोहण्यासाठी गेलेल्या २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज ०५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली आहे. ठाण्यातील परिसरातील मिलिटरी मैदानामधील पाण्याने भरलेल्या खड्डयामध्ये हे दोन तरुण पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (two children drowned while swimming in a large pit filled with water in thane) ठाण्यातील शिवाई नगर परिसर येथे मिलिटरीचे भले मोठे मैदान आहे. या मैदानामधील एका पाण्याने भरलेल्या खड्डयामध्ये २ तरुण पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अभिषेक शर्मा (१२ वर्षे) आणि कृष्णा गौड (११ वर्षे) असे या बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोन्ही तरुण हे उपवन येथील रामबाग परिसरात राहणारे आहेत. क्लिक करा आणि वाचा- घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि वर्तकनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या मदतीने या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढून वर्तकनगर पोलिस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले. या दोन्ही तरुणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31wJsZU

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.