Type Here to Get Search Results !

औरंगाबाद की संभाजीनगर?; निवडणुकीपूर्वी नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत

औरंगाबादः महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा संभाजीनगरचा मुद्दा चर्चेत आला आहे. कारण नुकत्याच औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीने औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. मात्र असं असतानाही काँग्रेस नेत्यांनी संभाजीनगर नामांतराला विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संभाजीनगरचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी असून शिवसेनेने सुरवातीपासूनच आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र गेली अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्ता असताना आणि मागील ७ वर्षे राज्यात सत्तेत असतांना सुद्धा शिवसेनेला शहराचं नाव बदलण्यात यश आलं नाही. विशेष म्हणजे आता शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही हा नामंतराचा वाद पुन्हा समोर आला आहे. एकीकडे शिवसेना औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतरासाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून संभाजीनगर नावासाठी विरोध होत आहे. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांनी शिवसेनेच्या भूमिकेला विरोध केला आहे. तर काँग्रेस निवडणुकीच्या दृष्टीने कधीच भूमिका बदलत नाही. त्यामुळे औरंगाबाद शहराचं नाव बदलण्यासाठी आमचं कधीही समर्थन राहणार नसल्याचं सुद्धा उस्मानी म्हणाले. तर, राष्ट्रवादीकडून सुद्धा औरंगाबादच्या नामांतरासाठी विरोध केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते कदिर मौलाना यावर बोलतांना म्हणाले की, राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की,लोकांच्या भावनांशी कुणीही खेळू नयेत. त्यामुळे अशा नामांतराच्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही, असं कादिर मौलाना म्हणाले. तर, यावर बोलतांना शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, संभाजीनगर हे नामांतर १९८८ मध्येच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. मात्र राष्ट्रवादी-काँग्रेसकडून याला आज जरी विरोध होत असेल तरी त्यांच्या मतात परिवर्तन नक्कीच होईल असे दानवे म्हणाले. त्यामुळे आगामी काळात औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GcL0Y2

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.