Type Here to Get Search Results !

पहिली संधी राष्ट्रवादीला! जळगाव बँकेच्या अध्यक्षपदासाठी खडसेंनी सुचवलं 'हे' नाव

जळगाव: जिल्हा बँकेचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेआधी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी माजी मंत्री यांच्या, तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडं दाखल केले असून लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. ( will be the new Chairman of Jalgaon District Bank) जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्ष पद नेमकं कोणाला मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी फॉर्म्युला ठरविण्यात आला. वाचा: राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याचे अधिकार वरिष्ठ पातळीवरून यांना देण्यात आले होते. खडसे यांची तब्बल तासभर संचालकांसोबत बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर देवकर व सोनावणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार पहिली तीन वर्षे गुलाबराव देवकर हे अध्यक्ष म्हणून काम पाहतील, तर पहिली दोन वर्षे शिवसेनेचे श्याम सोनवणे यांना उपाध्यक्षपदी संधी मिळणार आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3olFDjn

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.