Type Here to Get Search Results !

धक्कादायक! पैशाच्या मोहातून अल्पवयीन मुलीचा विवाह, आईच्या विरोधानंतर…

विजयसिंह होलम । अल्पवयीन मुलींचे विवाह टाळण्यासाठी कितीही मोहिमा आणि घोषणा झाल्या तरी हे प्रकार थांबायला तयार नाहीत. नगर जिल्ह्यातील तालुक्यात असाच प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी मुलीच्या आईचा विरोध होता. तिने तक्रारही केली होती. तर संबंधितांनी जागा बदलून हा विवाह लावून दिला. या बदल्यात पैशांची देवाणघेवाण झाल्याचीही माहिती आहे. आईने आता 'चाइल्ड लाइन'च्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकारात केवळ मुलगीच नव्हे तर मुलगाही अल्पवयीन आहे. बारा वर्षांची मुलगी आणि चौदा वर्षे वयाचा मुलाचा विवाह लावण्यात आला आहे. या बदल्यात संबंधितांना दीड लाख रुपये मिळाल्याचे सांगण्यात येते. मुलीच्या आईचा याला विरोध होता, मात्र वडिलांच्या भूमिकेबद्दल संदिग्धता असल्याची माहिती पुढे आली आहे. वाचा: काही दिवसांपूर्वी हा विवाह करण्याचे ठरले होते. तो श्रीगोंदा शहरात होणार होता. मात्र, मुलीच्या आईने तक्रार केली. त्यामुळे प्रशासनाने दखल घेतल्याने तो हाणून पाडला गेला. त्यानंतर काही दिवसांत संबंधितांनी हा विवाह श्रीगोंदा शहराऐवजी तालुक्यातील ढवळगावात लावून दिल्याचे पुढे आले आहे. आईच्या मुलीचा विरोध, प्रशासनाने तंबी देऊनही संबंधितांनी हा विवाह लावून दिल्याची माहिती मिळाल्याने आईने आता पोलिसांकडे धाव घेतली आहे. अहमदनगरच्या चाईल्ड लाईन संस्थेनेकडून यासंबंधी पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनानेही या प्रकराची दखल घेतली आहे. संबंधितांना बाल कल्याण समिती समोर बोलविण्यात आले आहे. नव्या नियामानुसार गावात बालविवाहांसंबंधी कारवाईचे अधिकार ग्रामसेवकांना देण्यात आलेले आहे. एवढेच नाही तर गावात अशा घटना घडल्या तर ग्रामसेवकांना जबाबदार धरण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामसेवकांनाही समितीने बोलाविले आहे. तर आईने श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ii6wfY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.