Type Here to Get Search Results !

दगडाच्या ढिगाऱ्याचा देव! या देवाला फुले, नारळ नाही, तर दगडच अर्पण केले जातात

चिपळूण: कोकणात रत्नागिरी चिपळूणहून गुहागरच्या दिशेने निघालात की शृंगारतळी शहर सोडल्यानंतर रस्त्याच्या मधोमध एक भला मोठा ७ ते १० फुटाचा दगडाचा ढीग नजरेत पडतो. हा ढीग पाहिलात की तुमच्या मनात येईल की रस्त्याचे काम शिल्लक राहिली की काय, पण नाही, तुमचा अंदाज चुकतोय... हा ढीग काही काल परवाचा ढीग नाहीये, आणि हा नुसता दिसतो तसा ढीग नाहीये. तर मागच्या अनेक पिढ्यांपासून हा दगडाचा ढिगारा इथे आहे. या ढिगाऱ्याला इथे देवाचं स्थान आहे. (god of the heap of stones in chiplun and stones are offered to this god) दगडाच्या ढिग तयार होऊन निर्माण झालेले हे श्रद्धास्थान असल्यामुळे गुहागर तालुक्यात म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. गुहागर मार्गावरील पाटपन्हाळे हे देवस्थान गेल्या अनेक पिढ्यांपासून आहे. स्वयंभू असल्याने या स्थानाला इथे म्हणूनही संबोधतात. इथे पूर्वांपार शंकराचे स्थान असल्याचे ग्रामस्थ सांगतात. क्लिक करा आणि वाचा- गुहागर विजापूर महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी एका कोपऱ्यात असल्यामुळे दुर्लक्षित होते, मात्र महामार्गाच्या कामात हे स्थान मध्येच आल्यामुळे हा ढीग काढून टाकायचा असा निर्णय ठेकेदाराने घेतला होता,पण प्रत्यक्ष ढिगारा हटवण्यास सुरवात झाली त्यावेळी अनेक ब्लास्ट करूनही इथले दगड फुटले नाहीत,शिवाय या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काही भास झाल्याचेही स्थानिक सांगतात. खरंतर हा ढिगारा काढू नये यासाठी पाटपन्हाळे गावातुन कधीच विरोध झाला नाही, पण तरीही ठेकेदाराने प्रशासनाची स्वताच बोलून हा ढिगारा तसाच मधोमध ठेवायचा निर्णय घेत बाजूने रस्ता केलाय. क्लिक करा आणि वाचा- महाराष्ट्रात अनेक देवस्थाने आहेत, प्रत्येक भागातील देवस्थानचे तिथले एक वेगळे वैशिष्ट्य पहायला मिळतं. पण गडगोबा हे असे स्थान आहे जिथे ना घंटा, ना मंदिर, ना मूर्ती. केवळ दगडाच्या ढिगाऱ्यात परमेश्वर असल्याची श्रध्दा मनाशी बाळगून या मार्गावरून येणारा जाणारा स्थानिक आजही गाडगोबाला दगड अर्पण करूनच पुढच्या प्रवासाला जातो. ही परंपरा आजही अखंडित सुरू आहे. इथे कधीही होत नाही पूजा या स्थानाचं आणखी एक वैशिष्ठ्य असं की इथे कधीही पूजा होत नाही. वर्षातून एकदा शिमग्याच्या वेळी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र जमून गडगोबाला स्मरण करतात. कोकणात अनेक अशी देवस्थाने आहेत जी महाराष्ट्र देखील प्रचलीत आहेत. गुहागर हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे कोट्यवधी पर्यटक गुहागरला भेट देतात. नेहमीच नजरेआड असलेलं गडगोबाचं हे मंदिर आता रस्त्याच्या मधोमध आल्यामुळे फुलांच्या ऐवजी दगड स्वीकारणारे हे श्रद्धास्थान पुढील काळात आपल्यापैकी प्रत्येकाला पाहायला मिळेल एवढं नक्की. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rOgkbV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.