Type Here to Get Search Results !

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दुहेरी मार; पिके हातची गेलीच, शिवाय...

धुळे: जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसासह बोचऱ्या थंडीने सर्वसामान्यांसह जनावरांनाही बेजार केले आहे. गारवा सहन करू न शकल्यामुळे साक्री तालुक्यातील देगाव येथील एका शेतकऱ्याच्या दहा गायी दगावल्या आहेत. या घटनेमुळे इतर शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केलेले असताना, शेतकऱ्यांचे पशुधनही या अवकाळीला बळी पडत आहे. जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या देगाव गावामध्ये संततधार पडलेल्या पावसामुळे आणि गारव्यामुळे काठेवाड गोपाळ यांच्या दहा गायींचा मृत्यू झाला. या गायींमध्ये दुभत्या गायींसह लहान वासरांचाही समावेश आहे. वाचा: गेल्या दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्यामध्ये बोचरी थंडी, झोंबणारा गार वारा, ढगाळ वातावरण, त्यात रिमझीम पाऊस अशी बिकट परिस्थिती असल्यामुळे ही जनावरे दगावली आहेत. दुभती जनावरं दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून या मृत गायींचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक सहाय्य करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर, जिल्ह्यात अवकाळी पावसाने १०० पेक्षा ज्यास्त मेंढ्यांचा मृत्यू अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व संगमनेर तालुक्यात शेकडो मेढ्यांचा थंडीने गारठून मृत्यू झाला आहे. तर, सातारा जिल्ह्यात सुमारे १०० मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. त्यामुळे मेंढपाळ व शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे भिरडाचीवाडी, भुईंज , चंचळी, वाई , कराड अशा वेगवेगळ्या ठिकाणी गारठल्यामुळे ‌मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. रात्री अचानक वाढलेला पाऊस व हवामानात वाढलेला गारटा यामुळे बकऱ्यांचा मृत्यू झाला. अवकाळी झालेल्या या पावसाने शेतीसोबतच मुक्या पाळीव जनावरांच्या मृत्यूने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानीची भरपाई सरकार देणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xJM9U6

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.