Type Here to Get Search Results !

माझ्या जीवाला धोका आहे... पुण्यातील तरुणीचा थेट पोलीस आयुक्तांना मेसेज

म. टा. प्रतिनिधी । पिंपरी मला काही मुलांकडून धमक्या मिळत आहेत, ते माझा लैंगिक छळ करत आहेत, त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, असा मेसेज एका तरुणीने पोलिस आयुक्त यांना केला. या मेसेजची तातडीने दखल घेत सामाजिक सुरक्षा पथकातील अधिकाऱ्यांनी धावपळ करत मुलीचा आणि तीच्या आई-वडिलांचा शोध घेतला. मात्र, त्यानंतर तरुणी मानसिक रुग्ण असून ती नेहमीच असे कृत्य करत असल्याचे समजल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. मला काही मुलांकडून धमक्या मिळत आहेत. ते माझा लैंगिक छळ करत आहेत. मी या कृतीकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु, त्यांचे त्रास देणे वाढतच आहे. ते माझ्या जीवाला धोका पोहचवू शकतात. मी परराज्यातील असून शिक्षणासाठी येथे आली आहे. मला वेगवेगळ्य़ा फोनवरून सारख्या धमक्या मिळत आहेत. मी एकटी असून काय करावे हे मला सुचत नाही. मोबाईल नेटवर्कच्या अडचणीमुळे मला संपर्क करण्यास अडचणी येत आहेत, अशा आशयाचा व्हॉट्सअप मेसेज गुरुवारी दुपारच्या वेळेत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना आला. त्यापाठोपाठ लगेचच ईमेलही प्राप्त झाला. या प्रकाराची गंभिरता लक्षात घेत पोलिस आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना संबंधित तरुणीची तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी एक टीम तयार करून तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. वाचा: ज्या क्रमांकावरून तरुणीने मेसेज केला होता त्या क्रमांकावर पोलिसांनी मेसेज तसेच कॉल केला. ईमेलही केला. मात्र, संबंधित तरुणी पोलिसांचा कॉल कट करून वारंवार पोलिस आय़ुक्त आणि इतर पोलिसांनी मिस्ड कॉल देत राहिली. हे प्रकरण काहीतरी वेगळे असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी तांत्रिक विश्लेषण तरुणीच्या आई-वडिलांशी संपर्क साधला. मात्र, त्यानंतर वेगळेच सत्य बाहेर आले. आमची मुलगी पुण्यात शिक्षण घेत असून आमच्यासोबतच राहते. ती सध्या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. ते पाठविलेल्या मेसेजमध्ये ईमेल मध्ये कोणतेही तथ्य नाही, असे तीच्या पालकांनी सांगितले. तसेच आम्ही आज नाशिक येथे देवदर्शनासाठी आलो असून असा कोणताही प्रकार घडलेले नाही. आमची कोणतीही तक्रार नसल्याचे तीच्या पालकांनी सांगितले. दरम्यान, तरुणीबाबतचे सत्य जरी वेगळेच असले तरी तरुणीच्या मदतीसाठी वेळेत पोहचल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला. तरुणी कोणतीच माहिती देईना.. पोलिसांनी तरुणीच्या व्हॉट्सअपवर मेसेज केले, कॉल केले. पण तरुणी कोणताही प्रतिसाद देत नव्हती. शेवटी पोलिसांनी तरुणीचे लाईव्ह लोकेशन मागितले. मात्र, तेही तरुणीने दिले नाही. सर्व मेजेसे तरुणी वाचायची, मात्र, रिप्लाय देत नव्हती. कॉल कट करायीच. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढत होती. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ohBFYQ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.