Type Here to Get Search Results !

राज्याला ओमिक्रॉनी चिंता; मात्र, करोनाच्या दैनंदिन आकडेवारीने दिला 'हा' दिलासा

मुंबई: राज्यात आज शुक्रवारी करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसख्येत काहीशी घट झाली असून एकूण सक्रिय रुग्णसंख्याही कमी झाली आहे. याबरोबरच आज मृ्त्युसंख्येतही घट झाल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. आज राज्यात एकूण १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ९१५ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ६६४ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, राज्यात आज ७ हजार १३२ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (maharashtra registered 664 new cases in a day with 915 patients recovered and 16 deaths today) राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख ८५ हजार ३३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ५८ लाख ३९ हजार ६९२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ३७ हजार २८९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.०८ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ७९ हजार ९१९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ८८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. क्लिक करा आणि वाचा- याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार १४९ इतकी आहे. मुंबईत आज १९३ नवे रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज बुधवारी १९३ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७ लाख ६३ हजार ४०३ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये ३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ३४४ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ठाणे जिल्ह्यात आज एकूण ११८ नवे रुग्ण ठाणे जिल्ह्यात आज शुक्रवारी नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात १८, ठाणे महापालिका क्षेत्रात ३०, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ३५, कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात २२, तर उल्हासनगर मनपा क्षेत्रात २, मिरा-भाईंदर मनपा क्षेत्रात ११ रुग्ण आढळले आहेत. तर, पालघरमध्ये आज १ नवा रुग्ण आढळला असून, वसईविरार मनपा क्षेत्रात १३, रायगडमध्ये १० आणि पनवेल मनपा क्षेत्रात २० नवे रुग्ण आढळले आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lAfFqx

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.