Type Here to Get Search Results !

महिलांच्या तक्रारी, थेट आयोगापुढे सुनावणी, चाकणकरांचं मिशन 'महिला आयोग आपल्या दारी!'

गडचिरोली : महिलांच्या त्यांच्या तक्रारींबाबत स्थानिक स्तरावर आपलं म्हणणं मांडण्याकरिता किंवा पीडित महिलेला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या थेट आयोगापुढे मांडण्याकरिता '' हा उपक्रम आयोगाच्या अध्यक्षा यांनी राबविण्याचं ठरवलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ऑक्टोबर महिन्यात महिला आयोगाचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून महिला आयोग गतीमान पद्धतीने काम करत आहे. महिलांच्या तक्रारीनंतर त्यांना न्याय देण्यासाठी आयोग तात्काळ पावलं उचलत आहे. याच्या पुढचं पाऊल म्हणून थेट पीडित महिलांच्या गावात-जिल्ह्यात जाऊन स्वत: आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर गुरुवार दि. ०९ डिसेंबर रोजी चंद्रपूर तसंच शुक्रवार दि. १० डिसेंबर २०२१ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी होणार आहे. पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी ' आपल्या दारी' हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या संकल्पनेने अंतर्गत आयोगाकडे दाखल झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तक्रारींची सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. याचबरोबर नव्याने आलेल्या तक्रारीवरही कार्यवाही करण्यात येणार आहे. सुनावणी, तक्रारींसाठी मुंबई कार्यालयात येणे शक्य नसलेल्या महिलांना याचा फायदा होणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत दाखल तक्रारींची सुनावणी आणि नव्या तक्रारी यावर कार्यवाही होणार आहे. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून सुनावणी सुरु होईल.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31sy55N

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.