Type Here to Get Search Results !

VIDEO : 'या' आजींनी जे म्हटलं ते आयुष्यात विसरणार नाही तुम्ही, एसटी कर्मचाऱ्यांना म्हणाल्या...

सांगली : 'सगळ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही. तुम्हाला तुरुंगात डांबले तर मी जेवणाचे डबे घेऊन येते, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, अशा शब्दात एका आजीबाईने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठबळ दिले आहे. इस्लामपूर डेपोत आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पाठबळ देणारा आजीचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण राज्य शासनामध्ये व्हावे, यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दिवाळीनंतर पुन्हा आंदोलनाने जोर पकडला आहे. इस्लामपूर आगारातही एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून डेपोत ठिय्या मारला आहे. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या एका आजीबाईने उत्स्फूर्तपणे आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडून तिने हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला विनंती केली. आता काहीही झाले तरी आंदोलन मागे घ्यायचे नाही. पुढारी पैसे देऊन निवडून येतात. त्यांना लोकांची काळजी नसते. सरकार आंदोलकांना तुरुंगात डांबायची धमकी देतंय, पण तुम्ही तुरुंगात गेला तर, मी तुमच्यासाठी डबे घेऊन येईन. पण आता मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबवायची नाही, अशा शब्दात आजीबाईने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठबळ दिले. दरम्यान, उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी एकाने आजीबाईचे मोबाईलवरती चित्रीकरण केले. आजीबाईचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, कर्मचाऱ्यांनाही त्यातून बळ मिळाले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/306TyAy

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.