Type Here to Get Search Results !

आर्यन खान प्रकरणी नव्याने तपास!; SIT आज मुंबईत, कोण आहेत संजय सिंह?

मुंबई: एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांना मोठा धक्का बसला आहे. ते हाताळत असलेल्या सहा प्रकरणांचा तपास एनसीबी महासंचालकांनी वर्ग केला आहे. दिल्ली मुख्यालयातील अधिकाऱ्यांचं एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आलं असून या पथकाकडे हा तपास देण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री हा निर्णय झाला असून हे पथक लगेचच शनिवारी मुंबईत दाखल होत आहे, असे सांगण्यात आले. ( ) वाचा: ड्रग्ज पार्टी, ड्रग्ज प्रकरण व अन्य चार प्रकरणांचा तपास दिल्लीतील विशेष तपास पथक करेल. हा प्रशासकीय पातळीवरील निर्णय आहे. या निर्णयानुसार एनसीबीचं विशेष तपास पथक शनिवारी मुंबईत दाखल होईल व संबंधित प्रकरणांचा तपास हाती घेईल, असे एनसीबीचे उपमहासंचालक यांनी सांगितले. एनसीबीच्या या एसआयटीची धुरा उपमहासंचालक यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामागे खास कारण असल्याचे बोलले जात आहे. सिंह यांनी याआधीही अनेक हायप्रोफाइल प्रकरणे सक्षमपणे हाताळलेली आहेत. वाचा: कोण आहेत संजय सिंह? संजय सिंह हे १९९६च्या बॅचचे ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंतच्या सेवेत त्यांनी अनेक प्रमुख पदांची जबाबदारी सांभाळलेली आहे. ओडिशा पोलीस दलात अतिरिक्त आयुक्त म्हणून ते रुजू झाले होते. त्यानंतर ओडिशा पोलीस दलातच ते महानिरीक्षक होते. पुढे सीबीआयमध्ये त्यांनी सेवा दिली. तिथे अनेक प्रकरणं त्यांनी हाताळली. सीबीआयमध्येही ते महानिरीक्षक या पदावर होते. तिथून ते एनसीबीमध्ये आले. सध्या ते उपमहासंचालक (ऑपरेशन) या पदाचा कार्यभार पाहत आहेत. सिंह यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे मुंबईतील हायप्रोफाइल प्रकरणं सोपवण्यात आली आहेत, असे बोलले जात आहे. मीच केली होती विनंती: वानखेडे मुंबईतील सहा प्रकरणांच्या तपासासाठी महासंचालकांकडून विशेष तपास पथक नेमण्यात आल्यानंतर आपल्या मागणीनुसारच हे पथक नेमलं गेलं आहे, असा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे. काही प्रकरणांचा तपास एनसीबीच्या दिल्लीतील टीमकडून व्हावा, अशी माझी विनंती होती आणि त्यानुसार निर्णय झाला आहे. तपासातून मला हटवलेले नाही. ड्रग्जविरोधी एनसीबी मुंबईची मोहीम यापुढेही सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/305bRWH

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.