Type Here to Get Search Results !

वानखेडेंवर खंडणीवसुलीचा आरोप; NCB उचलणार पुढचं पाऊल, आता थेट...

मुंबई: मुंबईतील प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची एनसीबीचं दिल्लीतील विशेष तपास पथक (एसआयटी) चौकशी करत असून हे पथक सोमवारी पुन्हा एकदा मुंबईत येत आहे. ( ) वाचा: क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार याने खंडणीबाबत दावा केला आहे. आर्यनवर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये आणि त्याला अटक केली जाऊ नये म्हणून २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. यामागे आणि सॅम डिसूझा होते. या डीलमधील ८ कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांना मिळणार होते, असा धक्कादायक दावा साईल याने प्रतिज्ञापत्रावर केला आहे. या प्रतिज्ञापत्राची गंभीर दखल घेत एनसीबी महासंचालकांनी चौकशीसाठी दिल्लीतील अधिकाऱ्यांची एसआयटी नेमली आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह हे एसआयटीचे प्रमुख आहेत. वाचा: एसआयटीने याआधी मुंबईत येऊन सलग तीन दिवस तपास केलेला आहे. त्यात समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली आहे तसेच काही कागदपत्रेही ताब्यात घेतली गेली आहेत. प्रभाकर साईल यालाही जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्याच्यापर्यंत समन्स पोहचला नाही. तो या चौकशीपासून दूरच राहिला. त्यानंतर हे अधिकारी दिल्लीला परतले होते. हे अधिकारी सोमवारी (८ नोव्हेंबर) पुन्हा मुंबईत येत आहेत. यावेळी ते ज्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता त्या क्रूझवर जाऊन तपास करतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथून हे क्रूझ गोव्याला निघाले होते. त्यामुळे या टर्मिनलवरही तपास केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. येथूनच आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GY5B3x

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.