Type Here to Get Search Results !

mp kolhe meets mp supriya sule: एकांतवासानंतर खासदार अमोल कोल्हे नवी आव्हाने स्वीकारणार; घेतली सुप्रिया सुळेंची भेट

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe)यांनी आपण एकांतवासात जात असल्याची एक पोस्ट काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली आणि खासदार कोल्हे हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र, त्यानंतर आपण एकांतवासात गेलो म्हणजे नेमके काय याबाबत स्पष्ट करत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. हे स्पष्ट करताना आता आपण नव्या जोशानं नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी पुन्हा सिद्ध झालो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले होचे. त्यानंतर आता डॉ. कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (MP Supriya Sule) यांची भेट घेतली आणि त्यांच्या स्पष्टीकरणानंतर दबक्या आवाजात सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे. (ncp meets ) खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची खासदार कोल्हे यांची भेट घेतल्याचा फोटो ट्विट केल्यानंतर खासदार कोल्हे नाराज नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज भेट घेतली, असा मथळा असलेला भेटीचा फोटो ट्विट केला आहे. त्यानंतर आता खासदार कोल्हे याची नाराजी पूर्णपणे दूर झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. क्लिक करा आणि वाचा- मुळात नाराज झाले होते का?, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. ही चर्चा खासदार कोल्हे यांच्या स्पष्टीकरणामुळेच होत आहे. एकांतवासात जाऊन मी कोणताही फेरविचार केलेला नसल्याचं कोल्हे यांनी स्पष्ट केलंय. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना दिलेली आश्वासनं, संकल्पना याबाबतही फेरविचार करणं आवश्यक आहे. माझ्या एकांतवासात जाण्याबद्दल शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांना कल्पना होती, असंही कोल्हे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- 'नव्या जोशानं नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी मी पुन्हा सिद्ध झालो आहे' एकांतवासात जाणे किंवा आत्मचिंतन करणे म्हणजे नकारात्मक भावना असा विचार करण्याची आवश्यकता नसल्याचं कोल्हे म्हणाले. एकांतवास किंवा आत्मचिंतन हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. सुधारणेला नेहमीच वाव असतो या तत्वावर माझा ठाम विश्वास आहे. आपली वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी, आपल्या धेय्य निश्चितीसाठी आणि धेय्याप्रत जाणारा मार्ग ठरवण्यासाठी अंतर्मुख होणं गरजेचं आहे. असाच गेला काही काळ मी अंतर्मुख होतो आणि आता नव्या जोशानं नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी मी पुन्हा सिद्ध झालो आहे, असे कोल्हे यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DvjUL1

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.