Type Here to Get Search Results !

fadnavis vs malik: ईडी,सीबीआय की एनआयए?; फडणवीस मलिकांविरोधातले पुरावे कोणाला देणार?

मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी जमीन खरेदी प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांच्या कुटुंबीयांनी अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीनी खरेदी केल्या असून नवाब मलिक यांची एकूण ५ प्रकरणे आहेत. याचे पुरावे आपल्याकडे असून ते पुरावे मी तपास यंत्रणांकडे देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, फडणवीस यांच्याकडे नेमके कोणते पुरावे आहेत, त्याबाबतचा तपशील त्यांनी उघड केलेला नाही. ( has said that he will hand over all the evidence against to the ) नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या किमान ५ व्यवहारांची माहिती आपल्याकडे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या ५ व्यवहारांपैकी एकूण ४ व्यवहारांमध्ये १०० टक्के अंडरवर्ल्डचा सहभाग असल्याची मला खात्री असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच या एकूण ५ व्यवहारांची कागदपत्रे आपल्याकडे आहेत आणि ती मी संबंधित यंत्रणांकडे देणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- मात्र, फडणवीस यांनी केलेल्या आरोपांनुसार या जमीन व्यवहारांची व्याप्ती नेमकी किती आहे याचा तपशील फडणवीस यांनी दिलेला नाही. तसेच फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे नेमके कोणत्या तपास यंत्रणांना देणार?, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देणार, सीबीआयकडे देणार की एनआयएकडे देणार किंवा मग या सर्वच यंत्रणांकडे देणार, याबाबत अधिक स्पष्ट केलेले नाही. क्लिक करा आणि वाचा- आपले मंत्री काय 'कांड' करतात हे शरद पवारांना कळू द्या- फडणवीस नवाब मलिक यांची आपल्याकडे एकूण पाच प्रकरणे असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे नवाब मलिक यांच्या या प्रकरणांचे पुरावे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार आहे. आपले मंत्री काय 'कांड; करतात हे शरद पवार यांना कळू द्या, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. क्लिक करा आणि वाचा- नवाब मलिक यांनी फेटाळले आरोप दरम्यान, फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी फेटाळून लावले आहेत. जमीनीची खरेदी कायद्यानुसारच करण्यात आलेली असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आपण उद्या सकाळी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D0UWmr

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.