Type Here to Get Search Results !

युरोप, अमेरिकेतील करोना वाढीमुळे चिंता; BMC ने केली 'ही' मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरू लागल्याने आता व्यवहार सुरळीत होत आहेत. मुंबईत दैनंदिन करोना रुग्णसंख्या घटत असून उपचाराधीन रुग्णसंख्याही कमी होत आहे. मात्र जगभरात अमेरिकेसह रशिया आणि युरोप खंडात करोनारुग्ण वाढत आहेत. त्यामुळे येत्या काळात या देशांतून, मुंबईत पर्यटन वा अन्य कोणत्याही कारणाने येणाऱ्या प्रवाशांकडून करोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. तेथील करोनाच्या प्रकाराविषयी अधिक चिंता भेडसावत असून तेथील 'जिनोम सिक्वेन्सिंग'चे अहवाल मागवा, अशी मागणी पालिकेने राज्याच्या टास्क फोर्सकडे केली आहे. मुंबईत डिसेंबरमध्ये लग्नसराई, नाताळ, नवीन वर्षांच्या पार्ट्यांची रेलचेल असते. त्यामुळे करोना संसर्ग वाढलेल्या देशातून येणाऱ्या पर्यटकांमधून येथे पुन्हा वेगाने करोना फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच तेथील करोनाच्या विषाणूचा प्रकार नेमका कोणता असेल, हे जाणून घेण्याकडे पालिकेचा कल आहे. त्यानुसार आवश्यकता निर्माण झाल्यास त्यावर उपाय करता यावेत, म्हणून पालिकेने अमेरिका, रशिया, युरोपमधील करोनाचे जिनोम सिक्वेन्सिंगचे अहवाल मागवावेत, अशी शिफारस पालिकेने राज्याच्या करोना टास्क फोर्सकडे केली आहे. त्यातून विषाणू प्रकार, बाधा होण्याचे प्रमाण आणि उपचाराची दिशा निश्चित करण्याकडे कल असेल. विमानतळावर खबरदारी सध्याच्या स्थितीत करोना रुग्ण वाढलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांनी करोना प्रतिबंधक लसमात्रा घेतल्या नसल्यास त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटीसीपीआर चाचणी आणि सात दिवस गृह विलगीकरण केले जात आहे. त्यापूर्वी, करोना वाढल्याने हवाई प्रवासावर निर्बंध आणण्यात आले होते. करोना नियंत्रणात आल्यानंतर आणि भारताने ९६ देशांशी केलेल्या करारानंतर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सुरू झाला आहे. सध्या मुंबईत विमानतळावर देशांतर्गत आणि परदेश पर्यटक मिळून सुमारे ३० हजार प्रवासी येतात. तसेच, पालिकेने गेल्या वर्षभरात विमानतळावर ४ लाख २० हजार चाचण्या केल्या आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FKOdhf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.