Type Here to Get Search Results !

चंद्रकांत पाटील यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीत; राजकीय चर्चांना उधाण

मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते (Devendra Fadanvis)हे दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे गुरुवारीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrkant Patil) हे सुद्धा दिल्लीत असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची () भेट घेतली होती. आता चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ लगेचच देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय चर्चां रंगल्या आहेत. अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या नवीन निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळं पाटील- फडणवीस यांच्या दिल्लीवारीनंतर भाजप- मनसे युतीबाबत काही खलबतं होणार का?, अशीही चर्चा रंगली आहे. वाचाः देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील दिल्लीत दाखल झाल्याने पक्षांबाबत काही चर्चा होणार का. तसंच, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच, आता दिल्लीत देवेंद्र फडणवीस कोणाची भेट घेणार, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. वाचाः चंद्रकांत पाटील हे कालच दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा अचानक ठरला की पूर्वनियोजित होता, याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आली नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित काही बैठका असून त्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शाह यांना दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी या भेटीनंतर सांगितलं. तर, राज्यातील सद्यस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिल्याचे समजतेय. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3p3j1TS

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.