Type Here to Get Search Results !

सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रक-टँकरचा भीषण अपघात, ५ जण जागीच ठार

पुणे : सोलापूर-पुणे महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये पाचजण जागीच ठार झाले असून सहा जणांचा गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उजनी धरणाच्यासमोर भिमानगर इथं हा अपघात घडला. ( on Solapur Pune highway 5 killed on the spot) खरंतर, सध्या भीमा नदी पुलावरून रोडचं काम सुरू आहे. त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक या मार्गावर सुरू आहे. अशात वाहन चालकाला अंदाज न आल्याने अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सहा जणांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. इंदापूरकडून सोलापूरकडे टॅंकर जात असताना सोलापूरकडून पुण्याला येणाऱ्या ट्रकसोबत हा भीषण अपघात झाला आहे. अगदी उजनी धरणाच्या समोर एका ढाब्याजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु असल्याची माहिती आहे. (Truck tanker accident on Solapur Pune highway 5 killed on the spot) (Truck tanker accident on Solapur Pune highway 5 killed on the spot)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xsYlZg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.