Type Here to Get Search Results !

पत्नी-मुलांसह कोळी बांधवांचं बोटींमध्ये उग्र आंदोलन; आज आक्रोश मोर्चा

मुंबई: आपल्या विविध मागण्यांसाठी वरळी कोळीवाड्यातील कोस्टल रोड बाधित मच्छीमार कोळी बांधवानी आपल्या कुटुंबीयांसह बोटींमध्ये उग्र आंदोलन सुरू केले आहे. मुंबईतील सर्व मच्छीमार बंधु-भागिनींना सदर मोर्च्यामध्ये आपल्या बोटी घेऊन सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच वरळी कोळीवाड्यातील तमाम मच्छीमार बंधु-भागिनींना या मोर्च्यामध्ये सामील होण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक आजी-माजी लोक प्रतिनिधी, कोळी समाजाचे लोकप्रतिनिधी, समाज कार्यकर्ते यांचेही या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. (agitation of with their wives and children in the boat in mumbai) मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक १२ ऑगस्ट, २०२१ च्या आदेशानुसार सागरी क्षेत्रात होत असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याचे राज्यस्तरीय धोरण तयार करण्यासाठी जज्ज्ञांकडून अभिप्राय मागवले होते. क्लिक करा आणि वाचा- एकीकडे वरील अभिप्राय मागविण्याचा घाट घातला असताना सुद्धा दुसरीकडे मात्र कोस्टल रोडचे कामकाज मात्र स्थानिक भूमिपुत्र मच्छीमार कोळी बांधवांच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून सुरळीत ठेवण्यात आले होते, त्यामुळे वरळी कोळीवाड्यातील कोस्टल रोड बाधित मच्छीमार कोळी बांधवानी त्यांच्या खालील मागण्यासाठी गेले आठ दिवस भर समुद्रामध्ये ७०/८० बोटींमध्ये आपल्या बायका-मुले आणि कुटुंबीयांसह उग्र धरणे आंदोलन चालू ठेवले आहे, असे आंदोलकांनी सांगतिले. क्लिक करा आणि वाचा- या जनउद्रेकामुळे कोस्टल रोडचे काम बंद पडले आहे. कोळी मच्छीमार बांधवाना विश्वासात न घेता ज्या पद्धतीने हा प्रकल्प राबविला जात आहे त्यामुळे वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार कोळी बांधवांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवला आहे. त्यांचे अस्तित्वच नाहीसे होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे व संबधित अधिकाऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी वरळी कोळीवाड्यातील समस्त मच्छीमार कोळी बांधवांनी रविवार दिनांक ७ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ११ वाजता क्लीवलँड बंदर, वरळी सी फेस ते बतेरी असा आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. मुंबईतील सर्व मच्छीमार बंधु-भागिनींनी या मोर्च्यामध्ये आपल्या बोटी घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- आक्रोश मोर्च्यातील मच्छीमार कोळी बांधवांच्या प्रमुख मागण्या- > वरळी कोळीवाड्यातील कोस्टल रोड प्रकल्पबाधित भूमिपुत्राना क्लीवलँड बंदर येथे बोटी जाण्या-येण्यासाठी दोन पिलर्समधील एक तरी २०० मिटरचा स्पॅन मिळावा > मासेमारी क्षेत्रामध्ये BMC व संबधित आस्थापनांकडून समुद्रामध्ये जो भराव टाकण्यात आला आहे, त्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून कायद्यानुसार चारपट मोबदला संबधित प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून मिळावा. > वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार कोळी बांधवांच्या मासेमारी क्षेत्रात HCC-HDC कंपनीच्या जहाजाकडून होणाऱ्या जाळी तूटणे, समुद्रातील इतर सामानाच्या नुकसानाची भरपाई मिळणे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Yn6OA5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.