Type Here to Get Search Results !

मलिक यांचा वानखेडेंवर पुन्हा हल्ला; 'ही' दोन नावे घेत केले गंभीर आरोप

मुंबई: अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा याच्या अटकेमुळे मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण देशभरात गाजत असतानाच एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांच्यावर सातत्याने आरोप करणारे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी आज पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ( ) वाचा: आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आली व १८ कोटींना डील ठरले होते, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची एनसीबीच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांची एसआयटी तपास करत आहेत. हा तपास मुंबईत सुरू आहे. त्याचा संदर्भ देत नवाब मलिक यांनी या प्रकरणात नाव आलेल्या सॅम डिसूझाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. याचा जबाब दिल्लीत नोंदवून घेण्यात आल्याचे कळते आहे. याप्रकरणातील इतरांचे जबाब मुंबईत नोंदवण्यात येत असताना सॅम डिसूझा याचाच जबाब दिल्लीत नोंदवण्याचे कारण काय?, असा सवाल मलिक यांनी केला. सॅम हा दिल्लीत कुठे होता?, त्याने एनसीबीच्या कोणत्या अधिकाऱ्याला हवालाने पैसे पाठवले?, त्याच्यावरचा गुन्हा मागे घेण्यासाठी कोणते डील झाले?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एनसीबीला द्यावी लागतील, असेही मलिक म्हणाले. सॅम हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीतला माणूस आहे. सर्व नायजेरियन ड्रग्ज पेडलकरकडून हा हप्तेवसुलीचे काम करतो आणि तोच आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मैदानात उतरला आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. माझी लढाई एनसीबीसोबत नाही तर खोटी प्रकरणे बनवून मुंबईत वसुलीचे रॅकेट चालवणाऱ्या समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग, आशिष रंजन आणि माने नावाचा चालक या चौघांविरुद्ध आहे, असे मलिक म्हणाले. वाचा: मलिक यांनी याचे नाव घेत नवे आरोप केले. काशिफ खान हा क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा स्पॉन्सर होता. त्याच्यावर आजतगायत कारवाई का करण्यात आली नाही. त्याला अटक का करण्यात आली नाही?, असा सवाल मलिक यांनी केला. काशिफ खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आहे. तो सध्या गोव्यात आहे. तिथे रशियन माफिया कार्यरत आहेत. या सर्वांकडून वसुलीचे काम काशिफ खान करतो. वानखेडे यांच्यासाठी ही वसुली केली जाते, असा दावा मलिक यांनी केला. एनसीबीच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत गोवा राज्यही येतं. असं असताना येथे धाडी पडतात आणि गोव्यात धाडी का पडत नाहीत?, असा सवाल मलिक यांनी केला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kEkYoi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.