Type Here to Get Search Results !

लसीकरणासाठी अशीही कसरत! ओंडक्यावरून चालत गावकऱ्यांना दिली लस

औरंगाबादः जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाला संपवण्यासाठी सध्या लसीकरण हे एकमेव हत्यार आपल्यासमोर आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. यात आरोग्य विभागाचा मोठा वाटा असून, शहरापासून गाव, खेडी आणि तांड्यापर्यंत जाऊन लोकांना लसीकरण करण्याचे काम आरोग्य कर्मचारी करत आहे. असेच काही चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळाले. जीव धोक्यात घालून रस्ता नसतानाही चक्क नदीच्या पात्रातून लाकडाच्या ओंडक्यावर चालत शेतात राहणाऱ्या कुटुंबातील लोकांना लसीकरण करण्यात आलं. प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ अंतर्गत उपकेंद्र पळसवाडी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना एका शेतकरी कुटुंबातील लोकांना लस देण्यासाठी जायचं होतं. पण नदीच्या पात्रात पाणी असल्याने शेतात जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे चक्क नदीच्या पात्रातून लाकडाच्या ओंडक्यावर चालत जीव धोक्यात टाकून मोठी कसरत करत आरोग्य कर्मचाऱ्यांनी शेतात राहणाऱ्या नागरिकांचे लसीकरण केले. त्यांच्या या कामाचा सर्वत्र कौतुक होत आहे. वाचाः लसीकरणाबाबत औरंगाबाद जिल्हा पिछाडीवर असल्याने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेऊन औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता औरंगाबाद जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, रोज ६० हजारपेक्षा अधिक लोकांना लस देण्यात येत आहे. तर मोदींच्या बैठकीनंतर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हाती घेतलेल्या लसीकरण मोहीमनंतर १० टक्क्यांनी लसवंतांची वाढ झाली आहे. वाचाः यामुळे वाढला लसीकरणाचा टक्का... सुरवातीला औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही कठोर नियमांची घोषणा केली. लस असेल तरचं पेट्रोल, किराणा, रेशन, दारू आणि इतर सुविधा मिळतील असे आदेश काढले. त्यानंतर काही पेट्रोल पपं आणि इतर दुकानांवर कारवाई सुद्धा केली. त्यामुळे कारवाईच्या भीतीने व्यवसायिक आदेशाचे पालन करू लागले आणि सुविधा मिळत नसल्याने नागरिक ही लस घेण्यासाठी पुढे येऊ लागले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l9C3qB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.